जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रात स्वच्छता अभियान नगरपालिका प्रशासनाकडून यशस्वी;तब्बल 43 टन कचऱ्याचे झाले संकलन


जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रात स्वच्छता अभियान नगरपालिका प्रशासनाकडून यशस्वी;तब्बल 43 टन कचऱ्याचे झाले संकलन


अलिबाग,दि.26 (जिमाका) :- शहरांमध्ये फक्त सुशोभिकरणच नव्हे तर सातत्याने स्वच्छताही आवश्यक आहे. याचे महत्व जाणून जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के-पाटील व जिल्हा नगर प्रशासन अधिकारी शाम पोशट्टी यांच्या पुढाकारातून जिल्ह्यातील विविध नगरपालिका क्षेत्रातील अस्वच्छ जागा स्वच्छ करण्यासाठी  रायगड जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी व उपविभागीय अधिकारी कार्यक्षेत्रात जिल्ह्यात  दि.26 मे 2023 या एकाच दिवशी हे अभियान यशस्वीपणे राबविण्यात आले. तब्बल 43 टन कचरा या अभियानादरम्यान संकलित करण्यात आला. 

      या अभियानात रायगड जिल्ह्यातील 14.6 किमी रस्ते, 7.5 किमी गटारे स्वच्छ करण्यात आली. तसेच लहान स्वरुपातील 134 अतिक्रमणे हटविण्यात आली. या अभियानासाठी 43 मशिनरी वापरण्यात आल्या असून अभियानात 9 महत्वाच्या व्यक्ती सहभागी झाल्या होत्या, 1 हजार शासकीय/निमशासकीय कर्मचाऱ्यांचा सहभाग होता व 788 संस्था व नागरीक सहभागी झाले होते. 

    अशाच प्रकारचे पुढील स्वच्छता अभियान दि.26 जून 2023 रोजी राबविण्यात येणार आहे. हे अभियान आजच्या पेक्षाही प्रभावीपणे राबविण्यासाठी या अभियानात उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली मुख्याधिकारी, पोलीस यंत्रणा, सार्वजनिक बांधकाम विभाग, आवश्यक यंत्रणा यांच्यासह सन्माननीय लोकप्रतिनिधी, संस्था व नागरिक यांनाही सहभागी करून घेण्यात येणार आहे, जेणेकरुन या अभियानाची अंमलबजावणी प्रभावीपणे करता येईल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी व्यक्त केला.


Popular posts
विस्तारित बांबवडे उपसा सिंचन योजनेच्या दोन टप्प्यांतून ११केव्ही विद्युत वाहिनी सुरू होत असल्याने नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी
Image
पोलीस व आदिवासीमध्ये पेटली संघर्षाची ठिणगी ; शेवठी, बेकायदेशीर दगडखाणी मालकांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचे दिले आदेश..
Image
नवी मुंबईत जागतिक महिला दिनानिमित्त विविध कलागुणांचा उत्साही अविष्कार व कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
Image
पनवेलकरांच्या भीषण पाणीटंचाईवर आमदार विक्रांत दादा पाटील यांनी वेधले सरकारचे लक्ष.....!!
Image
२०३० पर्यंत ५०० दशलक्ष लोकांमध्ये श्रवणशक्ती कमी होण्याची शक्यता - जागतिक आरोग्य संघटनेने दिला इशारा
Image