आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या निर्देशानुसार संभाव्य दरडग्रस्त ठिकाणांची बारकाईने पाहणी


                                       

 

आयुक्त श्रीराजेश नार्वेकर यांच्या निर्देशानुसार संभाव्य दरडग्रस्त ठिकाणांची बारकाईने पाहणी




 

      खालापूर तालुक्यात इर्शाळवाडीत घडलेल्या दरड दुर्घटनेत मध्यरात्रीच नवी मुंबई महानगरपालिकेची मदतकार्य पथके महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या निदर्शनानुसार घटनास्थळी दाखल होऊन मदतकार्याला सुरुवात करण्यात आली होती. त्याचप्रमाणे आयुक्तांनी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील संभाव्य दरडग्रस्त ठिकाणांची पाहणी करण्याचे व त्या अनुषंगाने अहवाल सादर करण्याचे निर्देश अभियांत्रिकी विभाग तसेच संबधित विभाग अधिकारी यांना दिले होते.

      त्यास अनुसरुन शहर अभियंता श्री. संजय देसाई यांच्या नियंत्रणाखाली सर्व विभागांचे कार्यकारी अभियंता व उपअभियंता यांनी आपल्या सहकारी अभियंत्यांसह सकाळपासूनच आपापल्या कार्यक्षेत्रातील संभाव्य दरडग्रस्‍त ठिकाणांची पाहणी केली. परिमंडळ 1 विभागाचे उपआयुक्त श्री. सोमनाथ पोटरे व परिमंडळ 2 विभागाचे उपआयुक्त डॉ. श्रीराम पवार यांनीही विभाग अधिकारी यांच्यासमवेत पाहणी करून निर्देश दिले.

      त्याचप्रमाणे अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांनीही आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांच्यासमवेत काही ठिकाणांना भेटी देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली व संबधित अधिका-यांना त्याठिकाणी नियमित काटेकोर लक्ष देण्याच्या सूचना केल्या.

       नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दरड कोसळण्याची शक्यता असणा-या 15 संभाव्य ठिकाणांची यादी नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत यापूर्वीच प्रसिध्द करण्यात आली असून ही यादी विभाग कार्यालयामार्फत करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार तयार करण्यात आलेली आहे.

      यामधील रमेश मेटल कॉरी व इतर काही धोकादायक ठिकाणांची स्वतआयुक्त श्रीराजेश नार्वेकर यांनी पावसाळ्यापूर्वीच प्रत्यक्ष पहाणी केली होतीयावेळी आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार दरड कोसळण्याची शक्यता असणा-या संभाव्य ठिकाणी धोक्याची सूचना देणारे फलकही महानगरपालिकेमार्फत लावण्यात आले होतेसदरचे फलक लावलेल्या जागेवर नसल्यास ते आज सर्वेक्षण करताना पूर्ववत लावून घ्यावेत असेही आयुक्तांमार्फत निर्देशीत करण्यात आले आहे.

      पावसाळा कालावधीत येथील नागरिकांना धोक्याची कल्पना देऊन वारंवार सूचना करुनही नागरिकांकडून सदर जागा सोडण्यास अनास्था दिसून येतेतथापि इर्शाळवाडीत घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना धोक्याची पुर्वकल्पना दयावी व त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवावे असे आयुक्तांनी निर्देश देत कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये  याची दक्षता घेण्याचे महापालिकेच्या सर्व यंत्रणांना निर्देश दिले आहेत.

      नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील संभाव्य दरडग्रस्त ठिकाणी डोंगराळ भागात राहणा-या रहिवाशांनी आपल्या संरक्षणासाठी नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात येणा-या सूचनांचे पालन करुन संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्रीराजेश नार्वेकर यांच्या वतीने करण्यात येत आहे.