पनवेल महापालिकेच्या 41 संवर्गातील 377 विविध पदांची परीक्षा आजपासून सुरू-आयुक्त तथा प्रशासक गणेश देशमुख यांची रसायनीच्या पिल्लई HOCL कॅम्पस केंद्राला भेट


पनवेल महापालिकेच्या 41 संवर्गातील 377 विविध पदांची परीक्षा आजपासून सुरू-आयुक्त तथा प्रशासक गणेश देशमुख यांची रसायनीच्या  पिल्लई HOCL कॅम्पस केंद्राला भेट


पनवेल दि.८: पनवेल महापालिकेच्या 41 संवर्गातील 377 विविध पदांची ऑनलाइन परीक्षा आजपासून                   (ता. 8/12/2023) सुरू होत असून, ही परीक्षा चार दिवस विविध केंद्रांवर सुरू असणार  आहे. दरम्यान पनवेल महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक गणेश देशमुख यांनी रसायनी येथील पिल्लई HOCL कॅम्पस या परीक्षा केंद्रांला सकाळी भेट देऊन परीक्षा केंद्राची पाहणी करून सर्व आवश्यक सोयी सुविधा अद्यावत असल्याची खातरजमा केली.

                 पनवेल महानगरपालिकेच्या भरती परीक्षा पध्दती सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने पनवेल महापालिका मुख्यालय येथे कंट्रोल रुम तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये TCS कंपनींचे  प्रतिनिधी तसेच विभागीय समन्वयक, तसेच अधिकारी व कर्मचारी सकाळी 7 वाजले पासून दिवसभर कार्यालयात कार्यरत आहे. 

                 परिक्षा केंद्रांवर येणाऱ्या कोणत्याही तक्रारींचे तात्काळ निराकरण या महापालिका मुख्यालय कंट्रोल रुममधून करण्यात येत आहे. आज दिनांक ८ डिसेंबर रोजी ची परिक्षा ५७  केंद्रांवर सुरळितपणे घेण्यात आली.प्रत्येक परिक्षा केंद्रांवर पोलीस व्यवस्था, मोबाईल जॅमर, वैद्यकीय सुविधा, पिण्याच्या पाण्याची सोय इ. सोय करण्यात आली होती.

                  राज्यभरात 57 विविध केंद्रांवर होणाऱ्या परीक्षेला 55 हजार 214 उमेदवार बसणार आहेत. या परीक्षेवरील नियंत्रणासाठी  57 राजपत्रित अधिका-यांसोबत 441 अधिकारी /कर्मचारी यांच्या परीक्षा केंद्रांवर नेमणुका पनवेल महानगरपालिके मार्फत करण्यात आल्या आहेत.