क्रशरमुळे होत असलेल्या वायु प्रदूषणाने नागरिक हैराण, स्थानिक पडत आहेत आजारी, कारवाई करण्याची मागणी

क्रशरमुळे होत असलेल्या वायु प्रदूषणाने नागरिक हैराण, स्थानिक पडत आहेत आजारी, कारवाई करण्याची मागणी




नवीन पनवेल : पनवेल तालुक्यातील स्टोन क्रशरमुळे होत असलेल्या वायुप्रदूषणाने नागरिक पुरते हैराण झाले आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या परिपत्रकात स्पष्टपणे सूचना केलेल्या असताना एकाही सूचनेचे पालन स्टोनचे चालक करत नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होत असून नागरिकांना श्वसनाच्या आजारांना बळी पडावे लागत आहे. यावर त्वरित कारवाई करावी अशी मागणी वहाळ ग्रामपंचायतने प्रदूषण नियंत्रण मंडळ नवी मुंबई यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
       नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू असून या विमानतळा करता लागणारे गौण खनिज, दगड, शेजारील डोंगर पोखरून वहाळ ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या स्टोन येथे आणले जाते. त्यानंतर वहाळ ग्रामपंचायत हद्दीतील स्टोन क्रेशर मधून त्याचे रूपांतर वेगवेगळ्या आकाराच्या खडीमध्ये केले जाते व त्याची वाहतूक मोठ मोठ्या ट्रक मधून केली जाते. हे सर्व करत असताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडील शासन निर्णयाची पूर्णता पायमल्ली करत असल्याचे निदर्शनास येत आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होत असल्याने शासनाने वायू प्रदूषणासंदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र पनवेल तालुक्यातील स्टोन क्रशरचे मालक चालक याला कचऱ्याची टोपली दाखवत असल्याचे दिसत आहे. तरी वायू प्रदूषणाविषयी शासनाने ठरवून दिलेल्या सूचनांचे पालन न करणाऱ्या सर्व स्टोन क्रशानवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी ग्रामपंचायत वहाळ यांच्यातर्फे करण्यात आली आहे.
        वाढत्या प्रदूषणामुळे पनवेल तालुका चिंतेत आहे. पनवेल तालुक्यात जवळपास 100 क्रशर आहेत. कॉरी आणि क्रशर मुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होत आहे. घराच्या खिडक्या उघड्या ठेवल्या तर धुळीच्या कणांचा थर घरामध्ये आढळून येत आहे. हे सर्व धोकादायक असून त्याचा मानवी जीवनशैलीवर दूरगामी परिणाम होत आहे. या भागातील प्रत्येक कुटुंब खराब हवेच्या गुणवत्तेमुळे होणाऱ्या खोकला, सर्दी आणि श्वसन समस्यांना तोंड देत आहे. रात्री ही परिस्थिती आणखी बिकट होते कारण रस्त्यांवर धुळीच्या कणांचा जमाव झाल्यामुळे वाहन चालवणे धोकादायक होते. तसेच क्षयरोग फुफ्फुसाचा कर्करोग, दमा, कॅन्सर, बेशुद्ध होणे, घसा खवखवणे, डोळ्यातून पाणी येणे यासारखे विकार होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कॉरी आणि क्रशरवर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.
   

-
Popular posts
विस्तारित बांबवडे उपसा सिंचन योजनेच्या दोन टप्प्यांतून ११केव्ही विद्युत वाहिनी सुरू होत असल्याने नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी
Image
पोलीस व आदिवासीमध्ये पेटली संघर्षाची ठिणगी ; शेवठी, बेकायदेशीर दगडखाणी मालकांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचे दिले आदेश..
Image
नवी मुंबईत जागतिक महिला दिनानिमित्त विविध कलागुणांचा उत्साही अविष्कार व कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
Image
पनवेलकरांच्या भीषण पाणीटंचाईवर आमदार विक्रांत दादा पाटील यांनी वेधले सरकारचे लक्ष.....!!
Image
२०३० पर्यंत ५०० दशलक्ष लोकांमध्ये श्रवणशक्ती कमी होण्याची शक्यता - जागतिक आरोग्य संघटनेने दिला इशारा
Image