दहा अल्पवयीन मुला- मुलींवर बलात्कार तसेच लैंगिक अत्याचार करणा-याला आजन्म कारावास आणि २ लाख ३५ हजार दंड

दहा अल्पवयीन मुला- मुलींवर बलात्कार तसेच लैंगिक अत्याचार करणा-याला आजन्म कारावास आणि २ लाख ३५ हजार दंड

नवीन पनवेल : एप्रिल २०१४ ते ऑगस्ट २०१५ दरम्यान आरोपीचे राहते घरी  एल. आय.जी., सेक्टर २, कळंबोली, येथे आरोपी मुथ्थु आरमुगम नाडार याने तीन मुली आणि सात मुलगे अशा एकूण दहा अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार करून जबरी संभोग तसेच अनैसर्गिक संभोग केल्याप्रकरणी व पिडीत मुला मुलींचे अश्लिल व्हिडीओ चित्रण केल्याप्रकरणी आरोपी मुथ्थु आरमुगम नाडार याला पनवेल येथील विशेष सत्र न्यायाधीश शाहिदा शेख यांनी दोषी ठरवून आजन्म कारावास, सक्तमजुरी व एकुण  २ लाख ३५ हजार रुपये दंड शिक्षा ठोठावली आहे. दंडाची सर्व रक्कम सर्व पिडीत मुलांना समप्रमाणात देण्याचा आदेश करण्यात आला आहे.
        एल. आय. जी., सेक्टर २, कळंबोली येथे आरोपी याने पिडीत मुलीला प्रथम इडलीचे पिठ देतो असे सांगुन पिडीत मुलीस त्याचे घरी नेवून तिला अश्लिल व्हिडीओ चित्रण व फोटो दाखविले. त्यानंतर पिडीत मुलीस पैसे देण्याचे बहाण्याने घरी बोलावून पिडीत मुलीचा विनयभंग करून तिला दमदाटी देवून, पिडीत मुलीवर वारंवार जबरी संभोग व अनैसर्गिक संभोग केला व आरोपीने त्याचेकडील कॅमे-याद्वारे पिडीत मुलीबरोबर केलेल्या जबरी संभोगादरम्यानचे चित्रीकरण करून तिने तिच्या घरी सांगितल्यास तिला व तिचे आई वडीलांना मारण्याची धमकी दिली. गुन्हयातील आरोपीने पिडीत मुली प्रमाणे इतर आणखी मुली आणि मुलगे यांच्यावर देखील लैगिक व अनैसर्गिक अत्याचार करून चित्रीकरण केले. म्हणून भा.द.वि, पोक्सो कायदा आणि आय.टी अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला. कळंबोली पोलीस ठाणे यांनी सदर गुन्हयाचा तपास पूर्ण करून दोषारोपपत्र सत्र न्यायालयात दाखल केले. खटल्याची सुनावणी अलिबाग येथील अति सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात झाली. त्यानंतर सदर प्रकरण पनवेल हद्दीतील असल्याने ते पनवेल येथील नव्याने प्रस्थापित झालेले सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आल्यामुळे पुढील सुनावणी ही पनवेल येथील सहा. अति. सत्र न्यायाधीश, शाहीदा शेख यांच्या न्यायालयात झाली. 
     या प्रकरणामध्ये सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी अभियोक्ता यांनी एकुण २७ साक्षीदारांची साक्ष नोंदविली. सदर केसमध्ये सर्व पिडीत मुला-मुलींची, तसेच वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्वाची ठरली. तपासिक अंमलदार, आर. डी. वंजारी, पोलीस निरीक्षक, कळंबोली पोलीस ठाणे यांचा तपास महत्वाचा ठरला तसेच करंजकर, पो.ह बामणोलकर पो.ह. यांचे मोलाचे सहकार्य प्राप्त झाले. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी अभियोक्ता, ऍड प्रतिक्षा
वडे - वारंगे यांनी न्यायालयासमोर केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी मुथ्यु आरमुगम
नाडार याला आजन्म कारावास, सक्तमजुरी व एकुण  २ लाख ३५ हजार रुपये दंड शिक्षा ठोठावली आहे.या खटल्याच्या निकालाकडे पनवेल आणि कळंबोली परिसरातील लोकांचे लक्ष लागून राहिलेले
होते.




Popular posts
विस्तारित बांबवडे उपसा सिंचन योजनेच्या दोन टप्प्यांतून ११केव्ही विद्युत वाहिनी सुरू होत असल्याने नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी
Image
पोलीस व आदिवासीमध्ये पेटली संघर्षाची ठिणगी ; शेवठी, बेकायदेशीर दगडखाणी मालकांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचे दिले आदेश..
Image
नवी मुंबईत जागतिक महिला दिनानिमित्त विविध कलागुणांचा उत्साही अविष्कार व कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
Image
पनवेलकरांच्या भीषण पाणीटंचाईवर आमदार विक्रांत दादा पाटील यांनी वेधले सरकारचे लक्ष.....!!
Image
२०३० पर्यंत ५०० दशलक्ष लोकांमध्ये श्रवणशक्ती कमी होण्याची शक्यता - जागतिक आरोग्य संघटनेने दिला इशारा
Image