भीमाशंकर येथे कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या माध्यमातून भाविक भक्तांना अल्पोपहाराची सोय

भीमाशंकर येथे कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या माध्यमातून भाविक भक्तांना अल्पोपहाराची सोय



उरण दि ९(विठ्ठल ममताबादे )महाशिवरात्रीच्या निमित्ताने भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले शंभू महादेवाचे स्थान असलेल्या भीमाशंकर येथे शंकर महादेवाचे दर्शन घेण्यासाठी  पायी चालत जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या खांडस येथील निवासस्थानी दर वर्षाप्रमाणे यावर्षीही भक्तांसाठी अल्पउपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी स्वतः महेंद्रशेठ घरत व त्यांचे सुपुत्र कुणाल महेंद्रशेठ घरत भाविकांना अल्पउपहार देत होते.यावेळी साधारणतः २००० भाविकांना साबुदाणा खिचडी, सफरचंद ज्यूस व बिस्लरी पाणी बॉटल यांचे वाटप करण्यात आले. यावेळी पंचक्रोशीतील नागरिक व भाविकांनी महेंद्रशेठ घरत यांचे आभार मानले. यावेळी निवासस्थानाची देखभाल करणारे गरीब आदिवासी कुटुंब यांना महेंद्रशेठ घरत यांनी स्वखर्चाने नवीन घर बांधून दिले.त्या आदिवासी कुटुंबाने सुद्धा महेंद्रशेठ घरत यांचे आभार मानले व त्यांना आशीर्वाद दिले. यावेळी रायगड जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष  किरिट पाटील, रायगड जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष निखिल डवले, अनंत म्हसकर, कॉन्ट्रॅक्टर गोपीनाथ भोईर ,देविदास ऐनकर,यशवंत ढोंगे, बाळकृष्ण म्हात्रे,आनंद ठाकूर, विवेक म्हात्रे, प्रित म्हात्रे,ओम देशमुख, मेहबूब लादाप आदी मान्यवर उपस्थित होते.