बांठिया हायस्कूल येथे माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन

 बांठिया हायस्कूल येथे माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन

माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संखेने सहभागी व्हावेमाजी विद्यार्थी समन्वय समितीचे आवाहन

 


पनवेल( प्रतिनिधी) नवीन पनवेल येथील  सुधागड एज्युकेशन सोसायटीचे केशरचंदजी आनंदरामजी बांठिया माध्यमिक विद्यालय तसेच एनएन. पालीवाला कनिष्ट महाविद्यालयामध्ये १९८३ पासून आजपर्यंत शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांसाठी रविवारदिनांक ५ मे २०२४ रोजी सायंकाळी ५ ते रात्री १० वाजे पर्यंत सेक्टर १८नवीन पनवेल येथील बांठिया हायस्कूलच्या  विद्यासंकुलातील वातानुकुलीत साभगृहात  माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात जास्तीत जास्त माजी विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन माजी विद्यार्थी समन्वय समितीने केले आहे.

              शाळेत ज्ञान दानाचे महत्कार्य केलेल्या माजी मुख्याध्यापकशिक्षकप्राध्यापक आणि मान्यवरांचा हृद्यसत्कार या माजी विद्यार्थी मेळाव्यात करण्यात येणार आहे. त्याचबरोबर  स्मरणिका प्रकाशनखेळमानवतेवर आधारित नाटिका,  करमणुकीचे सांस्कृतिक  कार्यक्रमस्नेहभोजन या कार्यक्रमासोबतच ग्रुप फोटो आणि सेल्फी साठी स्टॅन्ड उभारण्यात येणार आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी २५ माजी विद्यार्थ्यांची समन्वय समिती गठीत केली असून सर्व स्वयंसेवक विविध जबाबदाऱ्या पार पडत आहेत. या नियोजित कार्यक्रमात उपस्थिती साठी अजूनही ज्यांनी नोंदणी केली नाही अशा माजी विद्यार्थ्यांनी समितीचे प्रमुख रमेश यादव ९८७०२१७०७०, विनोद वाघमारे ९७०२५८०५०५तुषार देशपांडे ९७६९६१३६८४अमर शेळके ८६५२१२६००६, स्नेहा पाटील ९००२९२९७२८४मधुरा  तायडे ९९६७५९६००७श्रीकांत म्हात्रे ७६६९५५५७७  यांच्याशी संपर्क साधावा  अशी माहिती समन्वय समितीने दिली.

              शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठीनोकरी धंद्यासाठी किंवा इतर कारणासाठी दूर गेलेल्या आपल्या वर्ग मित्रांना पुन्हा एकदा या माजी विद्यार्थी मेळाव्याच्या निमित्ताने भेटता येणार आहे. आपल्याला माणूस म्हणून जगण्यासाठी शिक्षणासोबतच खेळभावनाशिस्तआदरमाणुसकीही शिकवली त्या आदर्श माजी शिक्षकांचे आशीर्वाद घेण्यासाठी या मनोमिलनाच्यामैत्रीच्यामाजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात मोठ्या संखेने उपस्थित राहावे  असे आवाहन के. आ. बांठिया हायस्कूल माजी विद्यार्थी समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

 


Popular posts
विस्तारित बांबवडे उपसा सिंचन योजनेच्या दोन टप्प्यांतून ११केव्ही विद्युत वाहिनी सुरू होत असल्याने नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी
Image
पोलीस व आदिवासीमध्ये पेटली संघर्षाची ठिणगी ; शेवठी, बेकायदेशीर दगडखाणी मालकांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचे दिले आदेश..
Image
नवी मुंबईत जागतिक महिला दिनानिमित्त विविध कलागुणांचा उत्साही अविष्कार व कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
Image
पनवेलकरांच्या भीषण पाणीटंचाईवर आमदार विक्रांत दादा पाटील यांनी वेधले सरकारचे लक्ष.....!!
Image
२०३० पर्यंत ५०० दशलक्ष लोकांमध्ये श्रवणशक्ती कमी होण्याची शक्यता - जागतिक आरोग्य संघटनेने दिला इशारा
Image