पनवेल महानगरपालिका व श्री.बापूसाहेब डी.विसपूते कॉलेज ऑफ एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जैवविविधता संवर्धनपर उपक्रमाचे आयोजन

पनवेल महानगरपालिका व श्री.बापूसाहेब डी.विसपूते कॉलेज ऑफ एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जैवविविधता संवर्धनपर उपक्रमाचे आयोजन



पनवेल,दि.2 : पनवेल महानगरपालिका व श्री. बापूसाहेब डी. विसपूते कॉलेज ऑफ एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमानातून जैवविविधता संवर्धनपर उपक्रमांतर्गत चिमणी संवर्धनासाठी व याच्या जनजागृतीसाठी रविवार दिनांक ३० जून रोजी "एक घोंसला चिड़ियों के लिए" ह्या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत चिमण्यांना कृत्रिम निवारा व अन्न उपलब्ध करून देण्यात येणारे फिडर महाविद्यालयाच्या परिसरातील झाडांना टांगण्यात आले.

      यावेळी आदर्श शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष धनराज विसपुते, संचालिका संगीता विसपुते, पनवेल महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाचे विभाग प्रमुख मनोज चव्हाण, यांनी सर्वांना मार्गदर्शन केले.

       पर्यावरणाच्या दृष्टीने चिमण्या व इतर पक्ष्यांची संख्या घटणे हा चिंताजनक विषय आहे. ह्याच विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त श्री.मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण विभागाचे उपायुक्त डॉ.वैभव विधाते यांच्या सूचनेनूसार माझी वसुंधरा 5.0 अंतर्गत श्री. बापूसाहेब डी. विसपूते कॉलेज ऑफ एज्युकेशन, पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने "एक घोंसला चिड़ियों के लिए" ह्या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. ह्या उपक्रमांतर्गत चिमण्यांचे संवर्धन व्हावे यासाठी जनजागृती करण्यात आली.  चिमण्यांना कृत्रिम निवारा व अन्न उपलब्ध करून देण्यात येणारे फिडर महाविद्यालय परिसरात असलेल्या प्रत्येक झाडावरती चिमण्यांसाठी घरटे टांगण्यात आले. 

      श्री. बापूसाहेब डी. विसपूते कॉलेज ऑफ एज्युकेशन व पनवेल महानगर पालिका यांच्यात नुकताच पर्यावरण जनजागृती व संवर्धन विषयी सामंज्यस्य करार करण्यात आला आहे . या अंतर्गत महापालिका व विसपुते महाविद्यालय यांच्यावतीने विविध पर्यावरणपूरक कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. यावेळी महाविद्यालयातील सुमारे १०० विद्यार्थ्यांनी ह्या उपक्रमात आपला सक्रीय सहभाग नोंदविला. महाविद्यालयाच्या प्राचार्य  डॉ. सीमा कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. ह्या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. व भविष्यातही अशा प्रकारचे अनेक उपक्रम या अंतर्गत राबविण्यात येणार आहे.

Popular posts
विस्तारित बांबवडे उपसा सिंचन योजनेच्या दोन टप्प्यांतून ११केव्ही विद्युत वाहिनी सुरू होत असल्याने नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी
Image
पोलीस व आदिवासीमध्ये पेटली संघर्षाची ठिणगी ; शेवठी, बेकायदेशीर दगडखाणी मालकांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचे दिले आदेश..
Image
नवी मुंबईत जागतिक महिला दिनानिमित्त विविध कलागुणांचा उत्साही अविष्कार व कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
Image
पनवेलकरांच्या भीषण पाणीटंचाईवर आमदार विक्रांत दादा पाटील यांनी वेधले सरकारचे लक्ष.....!!
Image
२०३० पर्यंत ५०० दशलक्ष लोकांमध्ये श्रवणशक्ती कमी होण्याची शक्यता - जागतिक आरोग्य संघटनेने दिला इशारा
Image