ढोरोशी गावात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नाम फलकाचे अनावरण

ढोरोशी गावात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नाम फलकाचे अनावरण



तारळे (प्रतिनिधी)-दि.१५- सातारा जिल्ह्यातील ढोरोशी या राजकीयदृष्ट्या अत्यंत सजग गावात काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नाम फलकाचे अनावरण जिल्हा प्रमुख हर्षल कदम यांच्या शुभहस्ते आणि ढोरोशी,वाघळवाडी,बहिरेवाडी व शिवपुरी या ढोरोशी ग्रामपंचायतीच्या हद्धीतील काही जुण्या काही नवीन शिवसैनिकांच्या उपस्थितीत उत्तमराव मगर यांनी केले.

     १९८६ च्या मे महिन्यांमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारून उत्तमराव मगर यांनी सातारा जिल्ह्यातील शिवसेनेच्या दुसऱ्या शाखेचे उदघाटण येथे केले होते.ही शाखा हिंदुहृदयसम्राट स्वर्गिय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आली होती.त्यावेळी म्हणजे ३८ वर्षांपूर्वी शिवसेनेचे मुंबईतील मोठे नेते सुरेश साळोखे,अॕड.सुधाताई चुरी आणि दादरच्या नगरसेविका सौ.शिंदे असे दिग्गज ढोरोशी गावांमध्ये आले होते.ही शाखा जिल्ह्यातील दुसरी असल्यामुळे त्यावेळी सातारा जिल्ह्यात शिवसेनेचे नेते तयार होणे बाकी होते.

      उत्तमराव मगर यांनी त्यावेळी ढोरोशी शिवसेना शाखेचे पहिले शाखाप्रमुख म्हणून त्या काळातील सुसंस्कृत आणि उच्च विद्याविभूषित तरूण चेहरा राजाराम मगर यांना नियुक्त केले होते.लगेच पुढील वर्षी सातारा जिल्ह्यातील पहिली महिला आघाडीची शाखा सुरू करून दिवंगत सौ.सुनंदा शिवाजी मगर यांची महिला शाखाप्रमुख म्हणून नियुक्ती केली.

     पाठीमागच्या काही काळात उत्तमराव मगर हे निवृत्तीचे जीवन जगत होते;पण २०२२ च्या शिवसेनेतील ऐतिहासिक बंडानंतर पाटण तालुक्यातील बहुतांशी कार्यकर्ते आणि पदाधिकारी सत्तेबरोबर म्हणजेच राज्य उत्पादन शुल्क मंत्री आणि पाटणचे आमदार शंभुराज देसाई यांच्याबरोबर गेल्याचे पाहून दोन वर्षात संपूर्ण तारळे भाग पिंजून काढून मातोश्रीचे निष्ठावान शोधून अल्पावधीतच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संघटीत आणि भक्कम करण्यात यशस्वी झाले आहेत.उत्तमराव मगर यांचे पाटण तालुक्याच्या राजकीय आणि सामाजिक अभिसरणात मोलाचे योगदान आहे.