पनवेल टाईम्स या वृत्तपत्र समुहातर्फे आदरणीय प्राचार्य श्री.माळी सरयांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार
पनवेल(प्रतिनिधी)- पनवेल टाईम्स या वृत्तपत्र समुहातर्फे आदरणीय प्राचार्य श्री.माळी सर,(प्राचार्य के.आ.बांठिया माध्यमिक विद्यालय व एन.एन.पालीवाला ज्यु कॉलेज,नवीन पनवेल) यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार देऊन गौरवीण्यात आले.प्राचार्य माळी सरांचे विद्यालयासाठीचे परिश्रम,तळमळ, कामाविषयीचे नियोजन आणि विशेष म्हणजे सर्व विषयांतील असलेली पारंगता यामुळे शाळेच्या प्रगतीचा उंचावणारा आलेख या बाबी हा पुरस्कार देताना विचारात घेतल्या आहेत.हल्लीच प्राचार्य माळी सरांची रायगड जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा एकमताने निवड झाली आहे.त्यामुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातून आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या पालकानकडून माळी सरांनवरती अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सुधागड एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष,सचिव आणि सेक्रेटरी व सर्व संचालक मंडळ आणि सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्राचार्य माळी सरांचे अभिनंदन केले आहे.