मा.नगरसेविका सौ.नेत्रा किरण पाटील यांच्या प्रयत्नाला यश;डेली बाजार चौकात सिग्नल बसवीण्याच्या कामाला सुरूवात

मा.नगरसेविका सौ.नेत्रा किरण पाटील यांच्या प्रयत्नाला यश;डेली बाजार चौकात सिग्नल बसवीण्याच्या कामाला सुरूवात


खारघर (प्रतिनिधी) दि.२४-आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महानगरपालिकेच्या मा.नगरसेविका सौ.नेत्रा किरण पाटील यांनी प्रभागातील नागरिकांची मागणी लक्षात घेवून सिग्नल यंत्रणा बसवून घेण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आले.आज हावरे डेली बाजार सेक्टर १३ येथील सिग्नल यंत्रणा बसवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.लवकरच तवा हॉटेल जंक्शन सेक्टर २१ येथे देखील सिग्नल यंत्रणा कार्यान्वित होणार आहे,असे पनवेल महानगरपालिकेच्या वतीने लेखी पत्र देऊन नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांना कळविण्यात आले आहे.

     या दोन्ही ठीकाणी नेहमी वहातुक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत होता आणि काही प्रसंगी येथे गंभीर अपघात सुद्धा झाले आहेत.सौ.नेत्रा पाटील यांच्या प्रयत्नामुळे नागरिकांना या समस्येपासून दीलासा मीळाला आहे.