खारघरमधील गणपती बाप्पांचे वाजत-गाजत हनुमान तलाव सेक्टर-१५ येथे विसर्जन

खारघरमधील गणपती बाप्पांचे वाजत-गाजत हनुमान तलाव सेक्टर-१५ येथे विसर्जन


खारघर (प्रतिनिधी),दि.१८- खारघरमधील ७०% घरगुती आणि सार्वजनिक मंडळांच्या गणपती बाप्पांचे विसर्जन हनुमान तलाव सेक्टर-१५ येथे होते.सालाबादप्रमाणे याही वर्षी वाजत-गाजत आणि ढोल ताशाच्या गजरात गणरायांना भाविकानकडून निरोप देण्यात आला.येथील गर्दीचे नियोजन आणि सुरक्षेची खबरदारी खारघरच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सौ.वैशाली गलांडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने चोख बजावली,तर गणेश मुर्तींच्या विसर्जनाची जबाबदारी पनवेल महापालिकेच्या पथकाच्या नियंत्रणाखाली स्वयंसेवकांनी आणि क्रेनच्या साहाय्याने पार पाडली.

     या सर्व विसर्जन सोहळ्यावरती पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त वैभव विधाते,श्री.संजय कटेकर श्री.गावडे,खारघरचे प्रभाग अधिकारी जितेंद्र मढवी हे जातीने लक्ष्य ठेवून होते.या विसर्जन सोहळ्यात शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने खारघरच्या माजी ग्रामपंचायत सदस्या सौ.उषा अडसुळे आणि शेकाप पनवेल विधानसभा उपाध्यक्ष श्री.अजित अडसुळे यांनी गणेश भक्तांसाठी,पोलीस बांधवांसाठी आणि महापालिकेच्या स्वयंसेवकांसाठी नाष्टा आणि पाण्याची मोफत व्यवस्था केली होती.

      या सोहळ्यासाठी सेक्टर-१५,१६,१७ आणि १८ मधील सर्वपक्षिय पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने पहाटे ४ वाजेपर्यंत उपस्थित होते.