शिक्षकदिन मोठ्या उत्साहात साजरा
पनवेल ५ (विजयकुमार जंगम )
रा. जि. प. प्रा. शाळा अरिवली येथे दिनांक ५ सप्टेंबर रोजी शिक्षकदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी नियोजन करून शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शर्मिला ससर मॅडम आणि शिक्षिका सौ. मीना जाधव मॅडम यांना डोळे बंद करून वर्गात यायला सांगून एक अनोख्या पद्धतीने शिक्षकदिन मोठ्या उत्साहात साजरा केला.
उपस्थित पाहुणे श्री. हनुमान ससर सर, श्री. विजयकुमार जंगम सर, श्री. अनिल ठाकूर सर यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करून सुंदर छानसा पेन भेट देऊन स्वागत करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी भेटकार्ड बनून, वर्गात छान सजावट करून अनपेक्षित अशा सुंदरप्रकारे शिक्षकदिन मोठ्या उत्साहात साजरा केला. सर्व विद्यार्थी सहभागी झाले.