रोजगार मेळाव्याचे आयोजन

 रोजगार मेळाव्याचे आयोजन 

पनवेल: लायन्स क्लब ऑफ पनवेल आणि जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार मेळाव्याचे आयोजन रविवार 13 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा ते तीन वाजेपर्यंत जनता विद्यालय, मोहोपाडा, रसायनी येथे करण्यात आले आहे. 
         या रोजगार मेळाव्यात अनेक कंपन्या सहभागी होणार असून अनेकांनी या रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे असे आवाहन जे एम म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रीतम म्हात्रे यांनी केले आहे.