पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात बेकायदेशीर फलकांविरोधात पालिकेची विशेष मोहीम


पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात बेकायदेशीर फलकांविरोधात पालिकेची विशेष मोहीम


पनवेल,दि.13 :पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात बेकायदेशीर फलक विरोधात विशेष मोहीम करण्याचे आदेश आयुक्त श्री. मंगेश चितळे यांनी दिल्यानंतर आज पनवेल, कामोठे, कळंबोली, खारघर या चारही प्रभागामध्ये सहायक आयुक्तांच्या नेतृत्वाखाली युध्द पातळीवर बेकायदेशीर फलक काढण्यात येत आहेत. 

बेकायदशीर फलक हटवण्याबाबत सुस्वराज्य फाऊंडेशन या संस्थेने केलेल्या मूळ याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर बुधवार दिनांक 9 ऑक्टोबर रोजी सुनावणी झाली. यावेळी उच्च न्यायालयाने बेकायदशीर फलक हटवण्यासाठी १० दिवसांची विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश राज्यातील सर्व महापालिका व नगर परिषदांना न्यायालयाने दिले होते. त्यानूसार आयुक्तांच्या निर्देशानूसार आज पनवेल महानगरपालिका हद्दीतील पनवेल, कामोठे, कळंबोली, खारघर या चारही प्रभागामध्ये सहायक आयुक्तांच्या नेतृत्वाखाली अनधिकृत फलक काढण्यात येत आहेत. 

या बेकायदेशीर फलक हटविण्याच्या विशेष मोहिमे दरम्यान मोठे होर्डिंग/बैनर, किऑस्क-युनिपोल होर्डिंग(वीज/दूरध्वनी/सिग्नल चे खांब यावरील),झेंडे, झाडावरील बैनर/पोस्टर्स, कमानी, अनधिकृत लाईटच्या माळा,रस्त्यामधील मंडप, डिव्हायडर मध्ये उभे केलेले कटाउट्स, इतर फलक काढण्यात येत आहेत. 

चौकट

दुपारच्या सत्रात खारघर प्रभाग अ मध्ये सुमारे 44 व नावडे उपविभागांमध्ये 34 बेकायदेशीर फलक काढण्यात आले, पनवेलमध्ये 56 अनधिकृत फलक काढण्यात आले, प्रभाग समिती कामोठे अंतर्गत 18 पोस्टर , 73 बॅनर, 6 कमानी यांच्यावर दुपार पर्यंत कारवाई करण्यात आली  तसेच कळंबोलीमध्ये सुमारे 150 अनधिकृत फलक काढण्यात आले.