मा.आ.बाळाराम पाटील यांच्या उपस्थितीत खारघरमधील कार्यकर्त्यांचा शेकापमध्ये प्रवेश

मा.आ.बाळाराम पाटील यांच्या उपस्थितीत खारघरमधील कार्यकर्त्यांचा शेकापमध्ये प्रवेश


खारघर(प्रतिनिधी)दि.७- नवरात्रोत्सवात शेतकरी कामगार पक्षात खारघरमध्ये मोठ्या प्रमाणावर इनकमींग सुरू झाले असून २०१४ च्या विधानसभा निवडणुकीवेळी इतर  पक्षात गेलेले अनेक कार्यकर्ते माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शेकापमध्ये जाहीर पक्षप्रवेश करीत आहेत.

    आज सेक्टर-१५ मधील महालक्ष्मी हौसिंग सोसायटीचे अध्यक्ष आणि आंबेडकरी चळवळीचे अनुयायी प्रविण कदम,संघर्ष मित्र मंडळाचे अध्यक्ष महेंद्र सोनवणे,सेक्टर-१५ रहिवाशी उत्सव मंडळाचे अध्यक्ष अशोक कोळसुलकर,कुंजविहार हौसिंग सोसायटीचे अध्यक्ष सुरेश वाघमारे,I T क्षेत्रातील तज्ञ सचिन नाक्ती,सेक्टर-१५ चे शिवसेना शाखाप्रमुख प्रदीप जाधव,सेक्टर-१५ मराठा समाजाचे समन्वयक भिमराव नलावडे,सामाजिक कार्यकर्ते अशोक पाटील,माजी सैनिक प्रकाश वानखेडे, गजानन कोळसुलकर,तुषार नलावडे,अजय सावंत,संजीवन गायकवाड,दीनेश पोळ,शंतनू कदम,अरवींद कदम यांनी बाळाराम पाटील यांच्या उपस्थितीत शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश केला.

     याप्रसंगी बोलताना प्रवीण कदम यांनी सांगीतले की,येत्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार बाळाराम पाटील साहेबांना निवडून देण्यासाठी आपण सर्वांनी प्रचंड परिश्रम घेउया.

     कार्यक्रमाला सेक्टर-१५ मधील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेकापचे खारघर शहर अध्यक्ष अशोक गिरमकर,पनवेल विधानसभा उपाध्यक्ष अजित अडसुळे आणि कृषि उत्पन्न बाजार समिती पनवेलचे अध्यक्ष देवेंद्र मढवी सुद्धा उपस्थित होते.