कामगार नेते महेंद्र घरत यांची जागतिक भरारी; ITF या जागतिक संघटनेवर एक्सिक्यूटिव्ह बोर्ड मेंबर पदी निवड

कामगार नेते महेंद्र घरत यांची जागतिक भरारी;

ITF या जागतिक संघटनेवर एक्सिक्यूटिव्ह बोर्ड मेंबर पदी निवड




उरण दि १४(विठ्ठल ममताबादे )जगातील १६० देश सभासद असलेल्या  इंटरनॅशनल ट्रान्सपोर्ट वर्कर्स फेडरेशन (ITF ) लंडन या बहुराष्ट्रीय संघटनेचे अधिवेशन १२ ते १९ ऑक्टोबर रोजी मोरोको येथे सुरु आहे. दिनांक १३ ऑक्टोबर रोजी या बहुराष्ट्रीय संघटनेच्या जागतिक कार्यकारिणीची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भारत देशातून कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांची एक्सिक्युटीव्ह मेंबर पदी निवड करण्यात आली.जिथे भारतीयांना प्रतिनिधीत्व मिळत नव्हते तिथे आपल्या नेतृत्व कौशल्याने कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी भारतीयांचा झेंडा रोवला.त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरानातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.विविध कामगार संघटनाचे प्रतिनिधी, विविध सामाजिक सांस्कृतिक, शैक्षणिक धार्मिक आदी विविध क्षेत्रातून विविध प्रतिष्ठित मान्यवरांनी कामगार नेते महेंद्र घरत यांच्या निवडीचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या व त्यांचे अभिनंदन केले.
Popular posts
विस्तारित बांबवडे उपसा सिंचन योजनेच्या दोन टप्प्यांतून ११केव्ही विद्युत वाहिनी सुरू होत असल्याने नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी
Image
पोलीस व आदिवासीमध्ये पेटली संघर्षाची ठिणगी ; शेवठी, बेकायदेशीर दगडखाणी मालकांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचे दिले आदेश..
Image
नवी मुंबईत जागतिक महिला दिनानिमित्त विविध कलागुणांचा उत्साही अविष्कार व कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
Image
पनवेलकरांच्या भीषण पाणीटंचाईवर आमदार विक्रांत दादा पाटील यांनी वेधले सरकारचे लक्ष.....!!
Image
२०३० पर्यंत ५०० दशलक्ष लोकांमध्ये श्रवणशक्ती कमी होण्याची शक्यता - जागतिक आरोग्य संघटनेने दिला इशारा
Image