प्रितम म्हात्रे हेच आम्हाला आमदार पाहिजे आहेत-राकेश तांडेल

प्रितम म्हात्रे हेच आम्हाला आमदार पाहिजे आहेत-राकेश तांडेल


उरण(प्रतिनिधी) - जसखार गावातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ग्रामपंचायत सदस्य राकेश तांडेल व ग्रामसुधारणा मंडळाच सेक्रेटरी मनोज ठाकूर यांनी शेतकरी कामगार पक्षाचे उरण विधानसभेचे अधिकृत उमेदवार प्रितम जे एम म्हात्रे यांना जाहीर पाठिंबा दिला.त्यांनी पुढे सांगितले की,उरण तालुक्याचा रखडलेला विकास शेतकरी कामगार पक्षच मार्गी लावू शकतो आणि प्रितम म्हात्रे स्वतः प्रकल्पग़्रस्त असून त्यांना आमच्या स्थानिक आगरी,कोळी व कर्हाडी समाजाच्या अडचणी वेगळ्या सांगण्याची गरज नाही.प्रितम म्हात्रे हेच आम्हाला आमदार पाहिजे आहेत.