शेकाप आमदार विधिमंडळात असणे गरजेचे, माजी उपसभापती शुभांगीताई पाटील यांचे प्रतिपादन

 शेकाप आमदार विधिमंडळात असणे गरजेचे, माजी उपसभापती शुभांगीताई पाटील यांचे प्रतिपादन


पनवेल : शेतकरी कामगार पक्ष हा जनतेच्या हृदयातील पक्ष आहे. राजकारणाच्या बदलत्या प्रवाहात कष्टकरी, श्रमजीवी जनतेचे प्रश्न विधिमंडळात ठामपणे मांडण्यासाठी शे.का. पक्षाचे आमदार विधिमंडळात असणे, गरजेचे आहे. असे मत उरण पंचायत समितीच्या माजी उपसभापती शुभांगी पाटील यांनी व्यक्त केले आहे. शेतकरी कामगार पक्षाचे उरण तालुका सहचिटणीस सुरेश पाटील यांच्या सहचारणी तथा उरण पंचायत समितीच्या माजी उपसभापती शुभांगी पाटील यांच्याशी निवडणुकीसंदर्भात त्यांनी प्रतिनिधीशी संवाद साधला असता, त्या बोलत होत्या.
      विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या एकीमुळे शेकापक्ष या निवडणुकीत उतरला असून, ही निवडणूक ताकतीने लढू असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान शेतकरी कामगार पक्षातर्फे प्रीतम जनार्दन म्हात्रे हे कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर उरण विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. ही निवडणूक जिंकण्याबाबत मनामध्ये काहीही शंका नाही. राजकारणाच्या माध्यमातून विचार टिकविण्याचा सामाजिक प्रामुख्याने शेतकरी कामगार पक्षाने पुढाकार घेतला आहे. शेतकरी कामगार पक्षाला मोठा इतिहास आहे. आता नवीन पिढीला जुने राजकारण आणि नवे राजकारण शिकविण्याची वेळ आलेली आहे. आपला उमेदवार जनतेच्या बांधिलकीचा आहे. सध्याच्या विरोधी उमेदवारांची समाजाप्रती बांधिलकी या ती काय? आणि वैचारिक भूमिका काय? असा सवालही त्यांनी बोलताना व्यक्त केला.
      शेकापक्षाचा भूगोल लहान असेल, पण इतिहास फार मोठा आहे. हे उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. पक्ष कधी संपत नाही. आपला पक्ष मतदारांच्या जीवावर उभा आहे. त्यामुळे आपली ताकद विरोधकांना या निवडणुकीत दाखवायची आहे. जनतेशी बांधिलकी असणाऱ्या प्रितम म्हात्रे यांना उद्याच्या निवडणुकीत भरघोस मतदान करा. असे आवाहनही माजी उपसभापती शुभांगीताई पाटील यांनी मतदारांच्या भेटीगाठीत केले आहे.