प्रितम म्हाञे यांचा जलवा, तरूणाई एकवटली
उरण : सिडकोच्या माध्यमातून उरण वेगाने विकसित होत असताना योग्य प्रशिक्षणाअभावी तरूणाच्या हाताला काम मिळत नसल्याने भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. या तरूणाचे भविष्य उद्थ्वस्त होवू नये यासाठी प्रितम म्हाञे यानी जे एम म्हाञे ट्रस्टच्या माध्यमातून युवकाना प्रशिक्षीत करण्याचे काम हाती घेतले आहे. गेल्या काही महिन्याच्या परिश्रमानंतर येथून प्रशिक्षण घेतलेल्या 44 तरूण तरूणीना विमानतळात नोकऱ्या मिळाल्याने तरूणाईत आशादायी वातावरण निर्माण होवून सारी तरूणाई त्यांच्या मागे एकवटली असल्याचे चिञ पहायला मिळत आहे.