युवा पिढीचा एकच नारा, उरणला आमदार प्रितम म्हाञेच हवा

 युवा पिढीचा एकच नारा, उरणला आमदार प्रितम म्हाञेच हवा


उरण : उरण विधानसभा मतदार संघातून आजवर निवडून गेलेल्या विद्यमान आमदाराला उरणकरानी पुढच्या इनिंगला नाकारले असून हाच सुर आळवत यावेळी उरणकरानी नवा कोरा युवा चेहरा प्रितम म्हाञे याच्या नावाला पसंती दिली आहे. त्यामुळे मतदार संघातील वातावरण पार बदलून गेले असून सर्वञ प्रितम म्हाञे याच्या नावाचीच चर्चा होत आहे.

        उरण विधानसभा मतदार संघाचे शेकाप उमेदवार प्रितम जे एम म्हाञे यानी मतदार संघातील गव्हाण जि प गटातील गावातून मतदाराच्या गाठीभेटी व संपर्क दौरा केला. त्यावेळी विभागातील तरूण, युवा वर्गातून प्रितम म्हाञे यांच्या प्रति प्रचंड ओढ व आकर्षण असल्याचे दिसून आले. उलवे येथे आयोजित कार्यक्रमात प्रितम म्हाञे याचे स्थानिक ग्रामस्थामधून जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना प्रितम म्हाञे म्हणाले की, या भुमीला संघर्षाचा इतिहास आहे. येथील ग्रामस्थानी लढून आपले हक्क मिळवले आहेत त्यामुळे येथील जनतेला जर कुणी गृहित धरत असेल तर तो त्याचा भ्रम आहै. आज येथील तरूणाईला रोजगाराच्या संधी मिळत नाहीत युवकाच्या या परिस्थितीचा इथले लोकप्रतिनिधी गैरफायदा घेत असून त्याची कमिशनखोरी वाढली आहे. त्याचे उद्योग वेळीच ठेचण्याची गरज आहे. तरूण वर्गाला नोकरी मिळवण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. त्यासाठी आम्ही युवकाना प्रशिक्षण देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या प्रशिक्षणाचा लाभ घेवून 44 तरूणानी नवी मुंबई विमानतळावर नोकरी मिळवण्यात यश मिळवले आहे. हे काम मोठ्या स्वरूपात पुढे न्यायचे असून त्यासाठी आमदारकीची संधी मिळाल्यास युवकाना भेडसावणारा बेरोजगारीचा प्रश्न निकाली काढू असा विश्वास दिला. या कार्यक्रमास जितेंद्र म्हाञे, वसंत पाटील, माधव पाटील, रमाकांत म्हाञे, सचीन ताडफळे, अनिल ढवळे आदी मान्यवर उपस्थित होते.

आपल्या सुखदुःखात सदैव सहभागी असणाऱ्या शेकाप नेते प्रितम म्हाञे याना प्रचंड मतानी निवडून देणे आपले कर्तव्यच- विनोद साबळे
उरण : निवडणुका असो अथवा नसोत किंवा कोरोना सारख्या भयावह महामारीचे संकट असो आपल्या प्रत्येक हाकेला साद देवून मदतीसाठी धावून येणाऱ्या शेकाप नेते प्रितम जे एम म्हाञे याना या निवडणूकीत भरघोस मतानी निवडून आणणे आपले कर्तव्यच आहे असे प्रतिपादन मराठा महासंघाचे संघटन मंञी विनोद साबळे यानी केले. 
       उरण विधानसभा मतदार संघातील इंडिया आघाडीचे उमेदवार प्रितम जे.एम म्हाञे  यानी मतदार संघातील वासांबे जि.प गटातील गावातून मतदाराच्या गाठीभेटी  घेतल्या. यावेळी रीस ग्रामस्थाशी त्यानी संवाद साधला. यावेळी विनोद साबळे बोलत होते. ग्रामस्थाशी संवाद साधताना ते पुढे म्हणाले की, कोणत्याही पदावर नसताना प्रितम म्हाञे यानी गावकऱ्यांना प्रत्येक वेळी मोलाची मदत केली आहे. आपण सर्व वारकरी संप्रदायातील मंडळी आहोत आपल्याला कुणी मदत केली तर आपण त्याच्याबद्दल  उपकारांची जाण ठेवतो, ती भावना आपल्या मनात कायम वास करत असते. आज या निवडणुकीच्या निमीत्ताने या उपकाराची परतफेड करण्याची  संधी चालून आली आहे. ही संधी आपण वाया घालवणार नाही तर प्रितम म्हात्रे याना गावातून शंभर टक्के मतदान करून आघाडी मिळवून देवू असा विश्वास व्यक्त केला.
     यावेळी बोलताना प्रितम म्हाञे म्हणाले की, आमचा परीवार सामाजिक सेवेच्या भावनेतून सतत काम करीत आहे. निवडणूकावर डोळा ठेवून आम्ही कधी काम केले नाही आणि करणार नाही. माञ आज आपल्या समाजसेवेला व्यापक अधिष्ठान मिळावे यासाठी निवडणूक रिंगणात उतरलो आहे. त्यामुळे भविष्यात अधिक चांगले काम करण्यासाठी आपले आशिर्वाद आवश्यक आहेत. यावेळी युवा नेते शिवाजी काळे व अनेक मान्यवर, ग्रामस्थ उपस्थित होते.