पनवेल विधानसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार लिना गरड यांना मोटार सायकल रॅलीद्वारे उस्फूर्त प्रतिसाद

 पनवेल विधानसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार लिना गरड यांना मोटार सायकल रॅलीद्वारे उस्फूर्त प्रतिसाद

पनवेल, दि.12 (वार्ताहर) ः पनवेल विधानसभा 188 महाविकास आघाडीच्या उमेदवार लिना गरड यांच्या प्रचाराला आता चांगलाच जोर धरला असून, महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते घरोघरी जावून मशाल हे चिन्ह पोहचवित असून मशाल या चिन्हासमोरील बटण दाबून लिना गरड यांना प्रचंड बहुमताने विजयी करा, असे आवाहन करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे आज खारघर येथे काढण्यात आलेल्या मोटार सायकल रॅलीला खारघरवासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आम्ही मशालीच्या सोबत असल्याचे ठाम आश्‍वासनच दिले.

पनवेल शहर, खांदा वसाहत, कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल, खारघर आदी भागातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी हे आता रस्त्यावर उतरले आहेत. घरोघरी जावून प्रचाराचा वेग वाढत चालला आहे. लिना गरड यांचे परिचय पत्रक तसेच त्यांना मशाल या चिन्हासमोरील बटण दाबून प्रचंड मतांनी विजयी करा, अशा स्वरुपाच्या पत्रकांचे वाटप जोरदारपणे सुरू आहे. या प्रचारात तरुण वर्ग सुद्धा मोठा हिरीहिरीने भाग घेत असून शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी कॉर्नर बैठका, विविध समाज संघटना यांच्याशी संपर्क साधून त्यांना महाविकास आघाडीमार्फत यापूर्वी झालेली विकासाची कामे तसेच सत्तेत आल्यावर पनवेलच्या विकासासाठी करण्यात येणारी कामे याची माहिती जिल्हाप्रमुख शिरिष घरत यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात येत आहे. महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आता चांगलेच प्रचारात एकरुप होवून उतरले असून मशालीचा आवाज प्रत्येक शहरात, गल्लीत, विभागात दुमदुमू लागला आहे. यामुळे विरोधकांना याची चांगलीच धडकी बसल्याची चर्चा आहे. आज खारघरमध्ये या निमित्ताने मोटार सायकल रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत शेकडो युवक, कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी झाले होते. उमदेवार लिना गरड, मा.शहरप्रमुख गुरुनाथ पाटील यांच्यासह महिला आघाडी व पदाधिकारी उपस्थित होते. या रॅलीला सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

Popular posts
विस्तारित बांबवडे उपसा सिंचन योजनेच्या दोन टप्प्यांतून ११केव्ही विद्युत वाहिनी सुरू होत असल्याने नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी
Image
पोलीस व आदिवासीमध्ये पेटली संघर्षाची ठिणगी ; शेवठी, बेकायदेशीर दगडखाणी मालकांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचे दिले आदेश..
Image
नवी मुंबईत जागतिक महिला दिनानिमित्त विविध कलागुणांचा उत्साही अविष्कार व कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
Image
पनवेलकरांच्या भीषण पाणीटंचाईवर आमदार विक्रांत दादा पाटील यांनी वेधले सरकारचे लक्ष.....!!
Image
२०३० पर्यंत ५०० दशलक्ष लोकांमध्ये श्रवणशक्ती कमी होण्याची शक्यता - जागतिक आरोग्य संघटनेने दिला इशारा
Image