पनवेलमध्ये शिट्टीचा आवाज घुमणार

 पनवेलमध्ये शिट्टीचा आवाज घुमणार 


पनवेल : पनवेल विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार बाळाराम पाटील यांच्या प्रचार फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आम्ही ठरवलंय पनवेल विधानसभा मतदारसंघातून बाळाराम पाटील यांनाच प्रचंड बहुमतांनी विजयी करायचं आहे, अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त करण्यात आल्या. खारघर येथे मॉर्निंग वॉक प्रचारावेळी मालमत्ता करा संदर्भात अनेकांनी चर्चा केली. मॉर्निंग वॉक

प्रचारादरम्यान बाळाराम पाटील यांनी अनेक मतदारांसोबत संवाद साधला. यावेळी नागरिकांनी अनेक समस्या मांडल्या. त्या सोडवण्याचे आश्वासन बाळाराम पाटील यांनी दिले.
        महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी या प्रचार फेरीमध्ये सहभागी झाले होते. गेल्या अनेक वर्षांपासूनचे बाळाराम पाटील यांचे सामाजिक आणि शहर ग्रामीण विकासाचे काम आम्ही पाहत आहोत. त्यामुळे त्यांच्यासारख्या विकासाची जाण असणारा आणि नागरिक तसेच कार्यकत्यांचा सन्मान राखणारा आमदारच आम्हाला हवा आहे, असे नागरिकांनी सांगितले. ठिकठिकाणी बाळाराम पाटील यांचे अतिशय उत्साहात स्वागत करण्यात आले. त्यांना विजयासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. जनसामान्यांनी जो सन्मान आणि विश्वास दर्शवला त्याच्या बळावर निश्चितच पनवेल विधानसभा मतदारसंघात शिट्टीचा आवाज घुमणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.