उलवे से.17,18,19 मधील गार्डनचे लवकरच लोकार्पण

उलवे से.17,18,19 मधील गार्डनचे लवकरच लोकार्पण;"प्रितम म्हात्रे यांनी घेतला पाठपुरावा करत असलेल्या कामांचा आढावा"



पनवेल :   सिडकोच्या माध्यमातून उलवे येथे नवीन वसाहत गेल्या काही वर्षापासून वसवली गेली आहे. परंतु आवश्यक त्या सुखसुविधा उपलब्ध नाहीत त्यासंदर्भात शेतकरी कामगार पक्षाचे शिष्टमंडळ श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 26 /07/2024 माननीय सह व्यवस्थापकीय संचालक यांना भेटण्यासाठी गेले होते.  त्यांच्या दालनामध्ये उलवे संदर्भ मधील गार्डनचे आरक्षित प्लॉट जे  आहेत त्यांवर अतिक्रमण होण्याची वाट न पाहता सिडको ने पुढाकार घेऊन गार्डन सुशोभीकरण काम सुरू करावी अशी आग्रही भूमिका घेऊन सकारात्मक बैठक झाली होती. या वेळी उलवे विभागातील नित्य नियमाने कर भरणाऱ्या नागरिकांसाठी सिडकोने योग्य त्या आरोग्य आणि इतर सुविधा सुद्धा ज्या अपुऱ्या आहेत त्या मिळण्यासाठी संबंधित विभागीय अधिकाऱ्यांच्या सोबत सविस्तर चर्चा केली होती. 
      से.17, 18 आणि 19 येथील गार्डनच्या आरक्षित प्लॉटवर सिडको अधिकाऱ्यांच्या सोबत भेट देऊन तेथे सुरू असलेल्या कामाची त्यांनी पाहणी केली आणि त्या विभागातील नागरिकांना आवश्यक असलेल्या सोयी सुविधा ज्यात आवश्यक त्या ठिकाणी शौचालय, लहान मुलांना खेळण्यास लागणारे साहित्य आणि लाईट व्यवस्था  आणि 24 तास सुरक्षा रक्षक  बाबतीत उपस्थित अधिकारी वर्गासोबत सकारात्मक चर्चा करून योग्य ते नियोजन करण्यासाठी श्री प्रितम म्हात्रे यांच्याकडून सूचना करण्यात आल्या.
       यावेळी  आम्ही उलवेकर मित्र मंडळचे संस्थापक श्री. सचिन राजे येरुणकर , श्री. रुपेश मोहीते (मा. सरपंच ), श्री. सुजित मोकल (मा. सरपंच )श्री. हरिश्चन्द्र भगत, श्री. अखिल यादव, कु साई पैकडे उपस्थित होते.

कोट:- 
   सेक्टर 17 , 18 व 19 या ठिकाणी गार्डनचे प्लॉट राखीव आहेत परंतु त्या ठिकाणी सिडकोने काम सुरू करावे यासाठी गेले काही दिवस आम्ही पाठपुरावा घेत आहोत त्याचाच एक भाग म्हणून आज संबंधित विभागीय अधिकाऱ्यांसोबत त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली आणि लवकरच नागरिकांसाठी सुसज्ज असे गार्डन लोकार्पण करण्या संदर्भात अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून माहिती घेतली. यावेळी स्थानिक नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नांच्या बाबत अधिकारी वर्गाने लवकरच ते निकाली काढण्यात येतील अशी ग्वाही दिली.

प्रितम जनार्दन म्हात्रे 
खजिनदार 
शेतकरी कामगार पक्ष रायगड