तळोजा फेज १ मधील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा;कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी

तळोजा फेज १ मधील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा;कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी 


पनवेल (प्रतिनिधी) तळोजा फेज १ मधील आयशा हॉटेलने जागेची मर्यादा ओलांडत अनधिकृत बांधकाम केले आहे. या अनधिकृत बांधकामामुळे येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, त्यामुळे सदरचे अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे केली आहे. त्या संदर्भात त्यांनी निवेदनही आयुक्तांना दिले आहे. 

    पनवेल महानगरपालिका हद्दीतील तळोजा फेज १ मधील सेक्टर ०२ मध्ये असलेल्या आकार रेसिडेन्सी येथे "आयशा” नावाने हॉटेल व्यवसाय सुरू आहे. सदर हॉटेल मालकाने अनधिकृत बांधकाम करून बाहेरील जागेत किचन, तसेच फुटपाथवरसुद्धा अनधिकृत काम केले आहे, त्याचबरोबरीने अवैधपणे स्वच्छतागृह उभारले आहे. तसेच नावाला हॉटेल व्यवसाय दाखवला जात असून सदर जागेचा वापर मदरसा म्हणून करत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत आहेत आणि त्याच अनुषगांने अनधिकृत बांधकाम संदर्भातील फोटो तसेच व्हीडीओ सुध्दा उपलब्ध झाले आहेत. त्याचबरोबर यासंदर्भात तक्रारी करणाऱ्यांना हॉटेल मालकाकडून धमकावण्याचा प्रकार देखील होत आहे. त्यामुळे या प्रकरणी चौकशी करून तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी महानगरपालिकेकडे केली आहे. 


चौकट- 

पनवेल महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक ३ च्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या या आयशा हॉटेलच्या ठिकाणी विटांचे बांधकाम व पत्र्याचे शेड असे जवळपास २०८८ चौरस फूट सर्रासपणे अनधिकृत बांधकाम केल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे या हॉटेलच्या आडून मदरसा चालत असल्याचा धक्कादायक प्रकार व्हिडीओतून समोर आला आहे. हॉटेलचा चेहरा समोर करत मागील बाजूने मदरसा सारखे प्रकार घडत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे, त्यामुळे सदर बाबतीत कडक कारवाईची मागणी नागरिकांकडूनही होत आहे.


Popular posts
नवी मुंबई महापालिका शहर अभियंता पदी बेकायदेशीर नियुक्ती;महापालिका आयुक्तांची चौकशीची मागणी
Image
अनधिकृत फेरीवाल्यांवर, टपऱ्यावर ,बॅनर्सवर महापालिकेची तोडक कारवाई
Image
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा-आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी
Image
द ग्रेट इंडियन ट्रॅव्हलने केला १९ हजार पेक्षा जास्त किलोमीटरचा प्रवास; आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले कौतुक
Image