रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

 रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण


पनवेल (प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये विज्ञान व गणित प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये दोन रोबोट आकर्षण ठरले. संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

विद्यालयात 20, 21 डिसेंबर रोजी विज्ञान व गणित प्रदर्शन उत्साहात झाले. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी 300हून अधिक प्रकल्प सादर केले. यामध्ये 20 फूट उंच रोबोट आणि छोटा रोबोट हे मुख्य आकर्षण होते. रोबोट हस्तांदोलन करत व अवतीभोवती फिरून लक्ष वेधून घेत असल्याने पालकांनीही प्रदर्शनाची प्रशंसा केली.

या प्रदर्शनात रामसेतू (रामेश्वरम) येथून आणलेले तरंगते पाषाण ठेवण्यात आले होते. अनेकांनी या पवित्र पाषाणाचे दर्शन घेतले.

या प्रदर्शनास लोकनेते रामशेठ ठाकूर व व्हाईस चेअरमन वाय.टी. देशमुख यांनी भेट दिली. त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल, मुख्याध्यापिका राज अलोनी उपस्थित होत्या.