सीकेटी (स्वायत्त) येथे कॅपॅसिटी बिल्
पनवेल (प्रतिनिधी) चांगु काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स अँड सायन्स कॉलेज , न्यू पनवेल (स्वायत्त) येथे प्लेसमेंट सेलद्वारे गुरुवार (दि. १९) कॅपॅसिटी बिल्डिंग ऑन सॉफ्ट स्किल्स् अॅण्ड प्रि-प्लेसमेंट या सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमात ओवेन्स कॉर्निंग लिमिटेडच्या प्लांट एचआर मॅनेजर मा. स्निग्धा रावत यांनी त्यांच्या कंपनीमधील उपलब्ध संधी, कार्य संस्कृती माहिती दिली. तसेच मुलाखत कौशल्ये व विविध सॉफ्ट स्किल्स् काय आहेत आणि ती कशी आत्मसात करावी याविषयी मार्गदर्शन. तसेच, प्राचार्य प्रो.डॉ.एस. के. पाटील यांनी महाविद्यालयात होत असलेल्या करिअर संबंधित कार्यक्रमांबद्दल आणि इतर विद्यार्थीभिमुख कार्यक्रमाबद्दल माहिती दिली.
या कार्यक्रमाचा महाविद्यालायातील कला, वाणिज्य आणि शास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.
सदर कार्यक्रमास शास्त्र विभाग प्रमुख डॉ. जे. एस . ठाकूर, प्लेसमेन्ट सेलचे चेयरमन श्री सत्यजित कांबळे, ट्रेनिग आणि प्लेसमेन्ट ऑफिसर प्रा. आरती कागवाडे यांचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मिशेल जेन्सी आणि आभार प्रदर्शन प्लेसमेन्ट सेलचे चेअरमन प्रा. सत्यजित कांबळे यांनी केले.