पिल्लई अभियांत्रिकी महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांची गर्दी: मंत्रमुग्ध करणारा कार्यक्रमाचे प्रदर्शन आणि फटाक्यांची आतषबाजी

पिल्लई अभियांत्रिकी महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांची गर्दी: मंत्रमुग्ध करणारा कार्यक्रमाचे प्रदर्शन आणि फटाक्यांची आतषबाजी


पनवेल, दि.29 (वार्ताहर) ः पिल्लई अभियांत्रिकी महाविद्यालय (पीसीई), नवीन पनवेलचे ‘25 गौरवशाली वर्षे’  (1999-2024), आणि जगभरातील 1500 हून अधिक माजी विद्यार्थ्यांसह  रौप्य महोत्सवी माजी विद्यार्थी मेगा मेळावा 21 डिसेंबर 2024 रोजी साजरा करण्यात आला. 

उद्घाटन समारंभात दूरदर्शी नेते डॉ. के. एम. वासुदेवन पिल्लई, शिक्षणतज्ञ, अध्यक्ष, सीईओ आणि संस्थापक महात्मा एज्युकेशन सोसायटी (एमईएस) आणि डॉ.  डॅफ्नी पिल्लई, सचिव आणि संस्थापक एमईएस, डॉ प्रियम पिल्लई सीओओ एमईएस, आणि श्री फ्रनव पिल्लई, मुख्य विपणन आणि ब्रँडिंग अधिकारी एमईएस, प्राचार्य डॉ संदीप जोशी, पीआयएमएसआरचे संचालक डॉ चंद्रन आणि विभाग प्रमुखांच्या हस्ते दीपप्रज्वलन व केक कापण्यात आले.

प्राचार्यांनी संस्था आणि संशोधन आणि विकास आणि संस्थापकांच्या मार्गदर्शनातून मेकरथॉन, कोडर ऑफ द इयर, इनोव्हेशन आणि उद्योजकता इत्यादी सारख्या इतर उपक्रमांची माहिती देऊन पीसीईच्या  अत्यंत चित्तवेधक आणि महत्त्वाच्या राष्ट्रासेवेचा उल्लेख कारताना 3 आणि 4 ऑक्टोबर 2025 रोजी होणार्या पीसीईच्या फ्लॅगशिप द्विवार्षिक भविष्यातील शहरांसाठी तंत्रज्ञानावरील परिषद - कॉन्फरन्स फॉर फ्युचर सिटीज, उढऋउ-2025 मध्ये माजी विद्यार्थी, वर्तमान विद्यार्थी आणि प्राध्यापकवृंद  या सर्वांना आमंत्रित केले आहे. माजी विद्यार्थ्यांचा मेगा मीट हा केवळ पुनर्मिलनच आणि स्नेहसम्मेलन नव्हते तर पिल्लईंच्या वारशात मैत्री, तळमळ आणि अभिमान वाटून साजरा केला जाणारा एक उत्सवही होता. 12 बॅनर्सचे अनावरण करून कॉलेजचा प्रवास आणि त्यातील विविध यशांची आकर्षक आतषबाजी करण्यात आली.  पिल्लई अभियांत्रिकी महाविद्यालयावर व्हिडिओ दाखवून, माजी विद्यार्थ्यांच्या आवडत्या आठवणी, गंमतीसाठी खेळ, कॉलेज क्रूझ रंगमंच, रेक्रॉस आणि बेंचमार्कचे परफॉर्मन्स दाखवून कार्यक्रम अधिक रंगतदार झाला. ही संस्मरणीय रौप्यमहोत्सवी माजी विद्यार्थी मेगा मेळावा भूतकाळाचा सन्मान, वर्तमान साजरे करणे आणि भविष्याला एकत्रितपणे स्वीकारणे या उद्देशाने ! शेकडो माजी विद्यार्थ्यांच्या डीजेच्या तालावर उत्सव स्वरूपात  नृत्य करून कार्यक्रम संपला.