पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी नीलेश सोनावणे यांची सलग सातव्यांदा निवड
पनवेल/प्रतिनिधी
पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा पनवेल शासकीय विश्रामगृहात पार पडली. यावेळी २०२५ च्या.अध्यक्षपदी सर्वानुमते पनवेल युवा चे संपादक जेष्ठ पत्रकार निलेश सोनावणे यांची सलग सातव्यांदा निवड करण्यात आली. तर कार्याध्यक्ष पदी राम बोरीले ,उपाध्यक्ष पदी गणपत वारगडा, तर सचिवपदी शंकर वायदंडे, खजिनदार पदि राजेंद्र कांबळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
गेली सहा वर्षे पनवेल तालुका पत्रकार समितीचा पदभार सांभाळत अनेक सामाजिक उपक्रम राबवित असल्याने पुन्हा एकदा अध्यक्ष पद घ्यावे अशी सभासद व सदस्यांची इच्छा असल्याने सातव्यांदा निलेश सोनावणे यांच्या गळ्यात अध्यक्ष पदाची माळ टाकण्यात आली
,यावेळी निलेश सोनावणे यांनी पुन्हा एकदा सातव्यांदा आपल्यावर विश्वास दाखवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले व नवीन वर्षात नाविन्यपूर्ण उपक्रम सर्वांच्या सहकार्याने राबविण्यात येतील तसेच लवकरच पुढील वर्षांच्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात येईल असेही सांगितले. यावेळी पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे, कार्याध्यक्ष पदी राम बोरीले ,उपाध्यक्ष पदी गणपत वारगडा, तर सचिवपदी शंकर वायदंडे, खजिनदार पदी राजेंद्र कांबळे, अण्णा साहेब आहेर आदींसह उपस्थित होते