आर एम ए च्या क्रिकेट सामन्यात कलंबोली वारियर्स विजयी

 आर एम ए च्या क्रिकेट सामन्यात कलंबोली वारियर्स विजयी


 पनवेल/ प्रतिनिधी 

      रायगड मेडिकल असोसिएशन च्या वतीने दिनांक 30 नोव्हेंबर 2024 आणि 01 डिसेंबर 2024 असे दोन दिवस रायगड मधील डॉक्टरांसाठी नागोठणे येथे क्रिकेट सामन्यांची आयोजन करण्यात आले होते. या डॉक्टरांच्या अंतिम क्रिकेट सामन्यात डॉक्टर अरुणेश  शिंदे यांच्या  कळंबोली वॉरियर्स संघाने  पनवेल प्राइड संघाचा पराभव करत अंतिम विजेतेपद प्राप्त केले. या अंतिम सामन्यात उत्कृष्ट खेळाडू म्हणून डॉक्टर शेखर पवार यांची निवड करण्यात आली.

       दोन दिवस खेळल्या गेलेल्या या डॉक्टरांच्या क्रिकेट सामन्यात सर्वोत्कृष्ट मालिकावीर  म्हणून डॉक्टर सचिन मोकल, उत्कृष्ट फलंदाज डॉक्टर सचिन मोकल, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून डॉक्टर यासीन शेख, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक डॉक्टर मयूर  देशमाने उत्कृष्ट झेल डॉक्टर अरविंद खुटारकर आदींची निवड करण्यात आली. या क्रिकेट स्पर्धेत रायगड मधील डॉक्टरांच्या 20 संघानी भाग घेतला होता . यामध्ये प्रामुख्याने कलंबोली, तलोजा, पनवेल, रसायनी, कर्जत,पेण,अलिबाग, मुरुड, माणगाव, महाड आदी भागातील डॉक्टरांच्या संघानी भाग घेतला होता.खेळीमेळीच्या वातावरणांमध्ये या स्पर्धा पार पडल्या.

    यावेळी रायगड मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर निशिगंध आठवले यांनी सांगितले डॉक्टरांच्या आपल्या व्यवसायातील ताण-तणाव कमी करण्यासाठी आणि रायगड मधील जास्तीत जास्त डॉक्टरांना एकत्रित येण्यासाठी या सामन्यांचे आयोजन आम्ही दरवर्षी करत असतो. यावेळी रायगड मेडिकल असोसिएशनचे सेक्रेटरी राजेंद्र चांदोरकर, खजिनदार नवल किशोर साबू, डॉक्टर राजेश शिंदे डॉक्टर संजय पाटील, डॉक्टर हेमंत गंगोलीया, डॉक्टर रमेश पटेल आदरणीय आदींनी उपस्थित राहून डॉक्टरांच्या सर्व संघांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांचे मनोबल वाढवले.