श्री हनुमान मंदिर दिघोडे येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा
पनवेल : दिघोडे ग्रामस्थ मंडळाच्या व्यवस्थापनाखाली ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा श्री हनुमान मंदिर दिघोडे येथे आयोजित करण्यात आला होता. श्री समर्थ गोविंदबाबा वहाळकर यांच्या हस्ते मंगल कलश पूजन करून सोहळ्याची सुरुवात झाली. यावेळी माजी विरोधी पक्षनेते प्रीतम जे एम म्हात्रे उपस्थित होते.
श्री १००८ महामंडळेश्वर रामकृष्णानंद सरस्वती महाराज यांच्या नेतृत्वाखाली भव्य ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन केले आहे. या सोहळ्याला उपस्थित राहून पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते प्रीतम जे एम म्हात्रे यांनी कीर्तनाचा आस्वाद घेतला. आपल्या धावपळीच्या जीवनात आपली जी सांप्रदायिक परंपरा आहे ती आजही आपल्या ग्रामीण भागासोबतच शहरी भागातही जपली गेली पाहिजे हे मनापासून वाटते. आपल्या संतांनी दिलेले विचार जेष्ठ कीर्तनकारांच्या मुखातून ऐकताना सर्व मानसिक ताण निघून जातात याचा काल अनुभव आला असल्याचे प्रीतम जे एम म्हात्रे यांनी सांगितले.