अनधिकृत फेरीवाल्यांवर, टपऱ्यावर ,बॅनर्सवर महापालिकेची तोडक कारवाई
पनवेल,दि.21 : पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात अनधिकृतपणे रस्त्यांवर , फूटपाथवर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांवर, व्यावसायिकांवर, खाद्य व्यवसायिकांवर तसेच अनधिकृत बॅनर्स वरती आयुक्त श्री.मंगेश चितळे यांनी तोडक कारवाई तीव्र करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यानूसार आज चारही प्रभागांमध्ये विविध प्रकारची कारवाई करण्यात आली.
प्रभाग समिती क कामोठे अंतर्गत फुटपाथवरती अतिक्रमण करुन अनधिकृतपणे लावण्यात आलेल्या खाद्यपदार्थाच्या स्टाॅल्सवरती अतिक्रमण विभागाने कारवाई करून संबंधित ठिकाणी वापरण्यात येणारे सिलेंडर जप्त केले. तसेच वाहतूकीस अडथळा आणून रस्त्यावर अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या 2 हातगाड्या तोडण्यात आल्या. याचबरोबर फूटपाथवर उभारण्यात आलेल्या अनधिकृत टपऱ्यावर जेसीबीच्या साहाय्याने तोडक कारवाई करून फूटपाथ साफ करण्यात आले. यावेळी सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर, अधिक्षक सदाशिव कवठे, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
आयुक्त श्री. मंगेश चितळे यांनी दिलेल्या सूचनेनुसार उप विभाग नावडेमधील नावडे कॉलनी येथे शनिवार आठवडी बाजार बंद करण्यात आला. तसेच कामोठे येथे आठवडा बाजार भरवू दिला नाही.
याचबरोबर नवीन पनवेलमधील जनार्दन भगत मार्गावरील फुटपाथवरील अनधिकृत शेडवरती तोडक कारवाई करण्यात आली. तसेच या मार्गावरील विना परवानगी लावण्यात आलेल्या बॅनर्सवरती तोडक कारवाई करण्यात आली.
तसेच खांदा काॅलनीमधील फूटपाथवरील अनधिकृतपणे लावलेले बॅनर्स, दुकानांच्या नावाचे बोर्ड काढण्यात आले. तसेच फूटपाथवरती, रस्त्यावरती अनधिकृतपणे सुरू असलेल्या खाद्यपदार्थाच्या स्टाॅल्सवरती कारवाई करून सामन जप्त करण्यात आले.