अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा-आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा-आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी



पनवेल (प्रतिनिधी) पनवेल महानगरपालिका हद्दीत अनधिकृत आठवडा बाजार व हातगाड्यांच्या रूपाने 'नवा अनधिकृत व्यापार जिहाद' पुकारण्यात आला आहे, या अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा, अशी जोरदार मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी नागपूर येथे सुरु असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात केली. 
          आमदार प्रशांत ठाकूर यांनी सभागृहात सदरचा विषय मांडताना अनधिकृत आठवडा बाजार व हातगाड्यांमुळे नागरिकांना होणारा नाहक त्रास विशद केला. त्यांनी आपल्या औचित्याच्या मुद्यातून सांगितले कि, पनवेल विधानसभा मतदार संघात पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये ठिकठिकाणी आठवडा बाजार मोठ्या प्रमाणात सुरु आहे. दररोज महानगरपालिका हद्दीतील कुठल्याही शहरामध्ये आठवडा बाजार भरवले जातात. कुठलीही कायदेशीर परवानगी न घेता अवैधपणे व दादागिरीने हे बाजार चालवले जातात आणि त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष होत आहे. त्याचबरोबर हातगाड्यांचे मोठ्या प्रमाणात पेव फुटून या हातगाड्यांनी शहरातील प्रमुख रस्ते व्यापले आहेत आणि त्यामुळे स्थानिक नागरिक व अधिकृत व्यवसायिक तक्रार करत आहेत. मात्र महानगरपालिकेच्या माध्यमातून तकलादू स्वरूपाची कारवाई केली जाते. या हातगाड्यांवरती अनधिकृत धंदे सुद्धा चालवले जातात त्यामुळे वाहतुकीला अडथळे होतात अशा प्रकारच्याही तक्रारी वाढत चालल्या आहेत. त्याचबरोबर हातगाड्यांमार्फत आठवडा बाजारात मोठया प्रमाणात बांग्लादेशी लोकं व्यवसाय करत असल्याचे निदर्शनास आले आहे असेही त्यांनी सभागृहात अधोरेखित करून या विषयावरही शासनाचे लक्ष वेधले. 
         त्यांनी पुढे सांगितले कि, बांगलादेशात हिंदूंवरती अत्याचार होत आहेत. आणि मात्र त्याचवेळेला येथे कायद्यानुसार परवानग्या, कर भरणाऱ्या, आर्थिक गुंतवणूक, कर्ज घेऊन व्यवसाय करणाऱ्या अशा व्यावसायिक नागरिकांवर मात्र अन्याय होत आहे आणि त्यामुळे या व्यावसायिकांना व्यवसाय करणे कठीण झाले आहे. एकूणच अनधिकृत आठवडा बाजार व हातगाडीमुळे नवा अनधिकृत व्यापार जिहाद पुकारला गेला आहे त्याच्यावर कायद्याचा बडगा उगारण्याची आवश्यकता आहे, आणि त्या अनुषंगाने शासनाने महापनगरपालिकेला तातडीने कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे विधानसभेत मागणी केली.

Popular posts
नवी मुंबई महापालिका शहर अभियंता पदी बेकायदेशीर नियुक्ती;महापालिका आयुक्तांची चौकशीची मागणी
Image
अनधिकृत फेरीवाल्यांवर, टपऱ्यावर ,बॅनर्सवर महापालिकेची तोडक कारवाई
Image
तळोजा फेज १ मधील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा;कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी
Image
द ग्रेट इंडियन ट्रॅव्हलने केला १९ हजार पेक्षा जास्त किलोमीटरचा प्रवास; आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले कौतुक
Image