पनवेल शहर वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले वाहन चालकांचे प्रबोधन

पनवेल शहर वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले वाहन चालकांचे प्रबोधन


पनवेल, दि.26 (वार्ताहर) ः पनवेल शहर वाहतूक शाखेतर्फे वाहन चालकांचे प्रबोधन करणे हा उपक्रम राबविण्यात आला.

शहरातील शिवशंभो नाका, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक व पनवेल शहरात अशा वेगवेगळ्या ठिकाणी तसेच ओरॉयन मॉल अशा वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस निरीक्षक संजय पाटील ,पोलीस उपनिरीक्षक जीवन शेरखाने, पोलीस उपनिरीक्षक मनोज महाडिक व स्टाफने वाहन चालकांशी संवाद साधून त्यांना पनवेल शहरातील नागरिकांना  हेल्मेट वापरणे, दारू प्राशन करून गाडीने न चालवणे, सीट बेल्ट बेल्ट वापरणे, सिग्नल जंप न करणे इत्यादी तसेच वाहतुकीच्या इतर नियमाबाबत बाबत सांताक्लॉज मार्फत वाहतुकीचे नियमाचे फलक दाखवून जनजागृती केली. यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.