बांधकाम व्यावसायिकांकडून होणारे नियमांचे उल्लंघन व त्यामुळे होत असलेल्या प्रदूषण वाढीविरोधात सौ.नेत्रा पाटील यांचे आयुक्तांना नीवेदन

 बांधकाम व्यावसायिकांकडून होणारे नियमांचे उल्लंघन व त्यामुळे होत असलेल्या प्रदूषण वाढीविरोधात सौ.नेत्रा पाटील यांचे आयुक्तांना नीवेदन


खारघर (प्रतिनिधी)-आज पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ४ च्या मा.नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे साहेब यांना दिले निवेदन.

खारघर शहरात तसेच परिसरात अनेक दिवसांपासून नागरिक प्रदूषणामुळे त्रस्त आहेत. प्रदूषणामुळे परिसरातील विशेषता जेष्ठ नागरिक तसेच ज्यांना द  म्याचा आजार आहे अशा नागरिकांना मोठ्या प्रमाणात वायू-ध्वनी प्रदूषणामुळे त्रास होत आहे. खारघर शहरात सर्वच सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत सदर बांधकाम व्यावसायिक हे महानगरपालिकेने तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या नियमांची पायमल्ली करत असल्याचे रहिवाशांच्या तक्रारी आहेत. बांधकाम व्यवसायिकांकडून मोठ्या प्रमाणात धुळीचे कण, हवेत विरघळणारी विषारी रसायने इत्यादी घटकांमुळे होणारे हवेचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात केले जात असल्याचा रहिवाशांचा आरोप आहे. शहरात वायु,ध्वनी आणि जल प्रदूषण करणाऱ्यांवर थेट दंडात्मक कारवाईला सुरुवात दिसून येत नसल्यामुळे सर्वसामान्य रहिवाशी व मालमत्ता कर धारक हे पनवेल महानगरपालिकेवर प्रचंड नाराज असल्याचे दिसते. 

बांधकाम व्यावसायिकांनी त्यांच्या बांधकामा भोवती 18 मीटर उंचीची हिरव्या रंगाची जाळी अच्छादित केलेली नसल्याचे तसेच हवेत उडणाऱ्या धुळीच्या कणांवर नियंत्रण मिळविण्याकरिता पाण्याचे तुषार उडवणे बंधनकारक आहे परंतु कोणीही या नियमांचे पालन करत नसल्याचे दिसून येते म्हणजेच त्यांच्यावर महानगरपालिकेचा कुठलाही अंकुश नाही असे सर्वसामान्य नागरिक खाजगीत बोलतात. पनवेल महानगरपालिकेचे अधिकारी अथवा संबंधित प्रभाग अधिकारी हे फक्त आपल्या वातानुकूलित दालनात दिवसभर बसून असतात असा आरोप देखील सर्वसामान्य रहिवासी करत आहेत. ते कुठल्याही प्रकारे बांधकाम व्यावसायिकांच्या स्थळांची प्रत्यक्ष पाहणी करत नाहीत त्यामुळे त्यांना धुळीचे व हवेचे प्रदूषण कसे दिसेल असे नागरिक विचारत आहेत. 

वरील सर्व बांधकाम व्यवसायिक पनवेल महानगरपालिकेच्या नियमांची नियमावली न पाळता बांधकाम करत आहेत अशा बांधकाम व्यवसायिकांवर तात्काळ कारवाई करत त्यांचे बांधकाम त्वरित थांबवण्यात यावे अशी समस्त नागरिकांची मागणी आहे. प्रदूषणाचा विळखा मोठ्या प्रमाणात वाढून नागरिक आजारी पडत आहेत अनेक तज्ञ डॉक्टरांचे याबाबत मत व्यक्त करण्यात आलेले आहे.आपण याची नोंद घ्याल व त्वरित कारवाई करावी.

असे निवेदन देताना खारघर मंडल भाजपा उपाध्यक्ष किरण पाटील यांच्यासहित मा.नगरसेवक निलेश बाविस्कर हे देखील उपस्थित होते.