रामकी कंपनीचे भिंत कोसळल्याची घटना, लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे माजी आमदार बाळाराम पाटील यांचे निर्देश
पनवेल : तळोजा एमआयडीसी येथील रामकी कंपनीची भिंत काही दिवसांपूर्वी कोसळली. यासंदर्भात शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी पालिका आयुक्त मंगेश चितळे, कंपनीतील अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांची बैठक आयोजित करून लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे निर्देश केले.
तळोजा एमआयडीसीसह मुंबई परिसरातील कंपन्यांच्या रासायनिक कचऱ्यावर प्रक्रिया करून विल्हेवाट लावण्याचे काम रामकी ग्रुपची मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनी करते. दोन वर्षापूर्वी येथील प्रदूषणामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांनी कंपनीभोवती सुरू केलेल्या उंच सुरक्षा भिंतीला विरोध केला होता. वर्षभरापूर्वी बांधण्यात आलेली भिंत गुरुवारी कोसळली. भिंत कोसळल्यामुळे ग्रामस्थ चिंतेत आहेत. काही दिवसांपूर्वी पिसार्वे येथील रामकी कंपनीची भिंत कोसळल्याची घटना घडली होती. त्यासंदर्भात माजी आमदार श्री.बाळाराम पाटील यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त श्री.मंगेश चितळे यांच्या दालनात कंपनीतील अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महानगरपालिकेचे अधिकारी अशी संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली.यावेळी योग्य सूचना देऊन लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. यावेळी मा. नगरसेवक ज्ञानेश्वर पाटील,शेकाप पनवेल पनवेल मनपा जिल्हा कार्यालयीन चिटणीस श्री.देवेंद्र मढवी,पनवेल महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.