अनधिकृत बांधकामे,अतिक्रमणे तसेच अनधिकृत होर्डींग, बॅनर्सवरही होणार कारवाई
अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणाबाबत जनहित याचिका 138 / 2012, 80 / 2013, 111 / 2022 व 209 / 2023 आणि अनधिकृत होर्डींग, बॅनर व पोस्टर्सबाबत जनहित याचिका 155 / 2011 अन्वये मा.उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार –
महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम, 1966 मधील कलमानुसार अनधिकृत बांधकाम / अतिक्रमणांवर नोटीस देऊन निष्कासनाची कारवाई करणे, निष्कासनाचा खर्च वसूल करणे, फौजदारी गुन्हे दाखल करणे, तसेच तद् अनुषंगिक कारवाई करण्यात येणार आहे.
मा.उच्च न्यायालयाने जनहित याचिका क्र.155 / 2011 मध्ये दि.09 ऑक्टोबर 2024 व दि.18 डिसेंबर 2024 अन्वये सार्वजनिक रस्ते, पदपथ तसेच वाहतुकीला अडथळा ठरणारे अनधिकृत होर्डींग, बॅनर्स / पोस्टर्स हे विशेष मोहीम घेऊन हटविण्याचे आदेशित केले आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात जाहिरात फलक, होर्डींग, बॅनर लावण्यासाठी महानगरपालिकेने जागा निश्चित केल्या असून त्याच जागांवर, विहित आकारमानात जाहिरात फलक, होर्डींग, बॅनर प्रदर्शित करण्यासाठी विहीत नमुन्यात विभाग कार्यालयात अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये अनधिकृत इमारती / अतिक्रमणे, विनापरवानगी जाहिराती / होर्डिंग्ज / बॅनर्स / पोस्टर्स आढळल्यास त्याची माहिती नागरिकांनी महानगरपालिकेस देण्यासाठी विभागनिहाय दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. तसेच यावर कारवाई करण्यासाठी संबंधित विभाग कार्यालयाचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून विभागनिहाय नियुक्ती करण्यात येत आहे.
नागरिक याविषयीच्या तक्रारी www.nmmc.gov.in या संकेतस्थळावरील ग्रिव्हेन्स पोर्टलवर किंवा My NMMC – माझी नवी मुंबई या मोबाईल ॲपवर अथवा 8422955912 या व्हॉट्स ॲप मोबाईल क्रमांकावर दाखल करू शकतात.
विभाग कार्यालयाचे नाव | प्राधिकृत अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी |
दूरध्वनी क्रमांक |
बेलापुर | डॉ.अमोल पालवे | 27573826 / 27570610 |
नेरुळ | श्री.जयंत जावडेकर | 27707669 |
वाशी | श्री. सागर मोरे | 27655370 / 27659741 |
तुर्भे | श्री. प्रबोधन मवाडे | 2783469 |
कोपरखैरणे | श्री. सुनिल काठोळे | 27542406 / 27542449 |
घणसोली | श्री. संजय रा. तायडे | 27692489 / 27698175 |
ऐरोली | डॉ. अंकुश जाधव | 27792114 |
दिघा | श्री.भरत धांडे | 27792410 / 27792411 |
मुख्यालय | डॉ. अमोल पालवे | 27567060 / 27567061 |
या अनुषंगाने सर्व नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येते की, विनापरवानगी बांधकामे करणाऱ्यांविरूध्द महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम, 1966 चे कलम अन्वये व भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच विनापरवानगी जाहिराती / होर्डिेंग्ज / बॅनर्स / पोस्टर्स आढळल्यास त्यांविरूध्द महाराष्ट्र सार्वजनिक मालमत्ता विरूपण अधिनियम, 1995 मधील तरतुदीनुसार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात येईल याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावयाची आहे.