प्रितम दादा म्हात्रे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमानी साजरा

प्रितम दादा म्हात्रे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमानी साजरा    



  उरण : शेतकरी कामगार पक्षाचे रायगड  जिल्हा खजिनदार प्रितम दादा म्हात्रे यांच्या वाढदिवसा निमित्त उलवे नोड येथे सामाजिक उपक्रम पार पडले.         उलवे येथील आम्ही उलवेकर मित्र मंडळ आणि महिला मंडळ, श्री. विठ्ठल -रुख्मिणी मंदिर समिती सेक्टर 16, नवयुग मित्र मंडळ सेक्टर 9, श्री गणेश सार्वजनिक मित्र मंडळ सेक्टर 17, सेक्टर 8 रहिवाशी संघटना यांच्या वतीने श्री. प्रितम दादा म्हात्रे  यांच्या वाढदिवसाच्या निमित्त भव्य रांगोळी स्पर्धा, जेष्ठ नागरिक यांच्या साठी विरंगुळा केंद्र, आणि ऑल इज वेल वृद्धाश्रमात फळ वाटप आणि इतर कार्यक्रमाचे आयोजन  करण्यात आले होते. यावेळी जितेंद्र म्हात्रे, सचिन राजे, सुहास देशमुख, प्रल्हाद भगत, रोहन खंडू, महेश मगर, मिलिंद डोके, श्री.साई पैकडे, सावळाराम नलावडे, राकेश करगुटकर, अशोक फाटक,  प्रमोद भगत आदीसह उलवे वासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.