मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार

मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार



नवी मुंबई:मेडिकवर हॉस्पिटलमधील *वरिष्ठ इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट आणि व्हॉल्व्ह तज्ञ डॉ. अनुप महाजनी, या प्रक्रियेचे शोधक डॉ. सायबल कर(इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट व या प्रक्रियेचे शोधक कॅलिफोर्निया, यूएसए), डॉ. मनोज अग्रवाल (सीनियर इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट, हैदराबाद), डॉ. नितीन बुरकुले (सीनियर इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट आणि इकोकार्डियोग्राफी तज्ञ)* यांच्या टिमने मायट्रल रेगर्जिटेशन( हा एक विकार आहे ज्यामध्ये हृदयाच्या डाव्या बाजूला असलेला मिट्रल झडप नीट बंद होत नाही) आणि हार्ट फेल्युअरन् ग्रस्त अशा ७८ वर्षीय रुग्णावर दुर्मिळ आणि गुंतागुतीची प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. ही आधुनिक प्रक्रिया  असून ओपन-हार्ट सर्जरीसाठी उच्च-जोखीम असलेल्या रुग्णांकरिता आशेचे किरण ठरत आहे.

मिट्राक्लिप ही धातूची छोटी क्लिप असते, त्यासोबत पॉलिएस्टर कापड असते, गळती होत असलेले मिट्रल वाल्व दुरुस्त करण्यासाठी योग्य जागी बसवली जाते आणि त्यामुळे रक्त प्रवाह योग्य दिशेने वाहू लागतो. हृदय निकामी झालेल्या रुग्णांसाठी ही जागतिक पातळीवर स्वीकारण्यात आलेली प्रक्रिया आहे.

 *मुंबईतील श्री. शिवाजी सांगलीकर* हे गेल्या ३ वर्षांहून अधिक काळापासून १० टक्के ऱ्हदयाची पंपिंग क्षमता व दीर्घकालीन हृदयविकाराचा सामना करत होते. सहा महिन्यांपूर्वी मेडिकवर हॉस्पिटलमध्ये डॉ. अनुप महाजनी यांनी त्यांचे सीआरटी-डी इम्प्लांटेशन केले, ज्यामुळे त्यांच्या ऱ्हदयाची पंपिंग क्षमता ३५ टक्क्यांपर्यंत सुधारली, त्यानंतर त्यांच्या आयुष्याची गुणवत्ता सुधारली आणि हृदयविकारासाठी वारंवार रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाणही कमी झाले. तरीही गंभीर मायट्रल रिगर्जिटेशनमुळे त्यांना रात्रीच्या वेळी कधीकधी श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांचे वाढलेले वय आणि मधुमेह तसेच क्रॉनिक रेनल फेल्युअर सारख्या विकारांमुळे ओपन-हार्ट सर्जरीचा पर्याय गुंतागुंतीचा होता. रुग्ण डॉ. अनुप महाजनी (इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट आणि व्हॉल्व्ह एक्सपर्ट) यांचा सल्ला घेत पुढील उपचार प्रक्रिया निश्चित केली.

 *डॉ. अनुप महाजनी(वरिष्ठ इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट आणि व्हॉल्व्ह एक्सपर्ट) सांगतात की,* आपत्कालीन परिस्थितीत रुग्ण दाखल झाला होती. त्याच्या एका आठवड्यापूर्वीच रुग्णाला व्हेंट्रिक्युलर टाकीकार्डियामुळे अनेक झटके आले होते. वाढत्या वयामुळे पारंपारिक शस्त्रक्रिया अत्यंत धोकादायक ठरली असती. मिट्राक्लिप प्रक्रियेसाठी तो योग्य आहे की नाही हे निश्चित करण्यासाठी डॉ. अनुप महाजनी यांनी 3D TEE (ट्रान्स एसोफगीयल इकोकार्डियोग्राफी) केली. ही हृदयाची इमेजिंग करण्याची एक पद्धत आहे. यामध्ये, हृदयाच्या आतून इमेज घेतल्या जातात. यासाठी, एक पातळ आणि लवचिक ट्यूब गळ्यातून खालील भागात घालण्यात येतो. या रुग्णासाठी मिट्राक्लिप प्रक्रिया हा एक उत्तम उपाय होता, जो उत्कृष्ट परिणामांसह कमीत कमी आक्रमक दृष्टिकोन पुरविते. मिट्राक्लिपमुळे व्हॉल्व्ह बंद करण्यास (क्लिपिंग) मदत होते. ही प्रक्रिया सुमारे दीड तास चालली. त्यानंतर रुग्णाला दुसऱ्याच दिवशी घरी सोडण्यात आले. आता हा रुग्ण कोणत्याही अडथळ्यांशिवाय श्वास घेत आहे आणि चांगल्या दर्जाचे जीवन जगत आहे. रुग्णावर योग्य वेळी उपचार न केल्यास त्याचा मृत्यू होऊ शकतो.

पारंपरिक ओपन हार्ट शस्त्रक्रिया ज्यांच्यावर केली जाऊ शकत नाही अशा अशक्त प्रकृतीच्या व वयस्क रुग्णांना नवे जीवन देण्यात मिट्राक्लिप रोपण हे एक वरदान ठरले आहे. पारंपरिक शस्त्रक्रियेशी तुलना करता मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर पुन्हा-पुन्हा रुग्णालयात भरती व्हावे लागत नाही. त्यामुळे दीर्घ कालावधीचा विचार केला तर ही प्रक्रिया कमी खर्चिक ठरते आणि रुग्णांना सर्वसामान्य जीवन पुन्हा जगण्यास सुरुवात करता येते. यामुळे रुग्णाला घ्याव्या लागणाऱ्या औषधांच्या संख्येत लक्षणीय घट होऊ शकते. प्रक्रियेचा परिणाम तात्काळ होतो आणि लाईव्ह इकोकार्डियोग्राफी प्रक्रियेदरम्यानच एमटीची तीव्रता कमी झाल्याचे दर्शवते *असेही डॉ महाजनी यांनी स्पष्ट केले.* 

मला श्वास घेण्यास त्रास आणि थकवा जाणवत होता, अगदी साधासोप्या कामांसाठी देखील संघर्ष करावा लागत होता. मला कधीच वाटले नव्हते की मी सामान्य जीवन जगु शकेन मात्र डॉ. अनुप महाजनी आणि त्यांच्या टीमने मला नवे आयुष्य मिळवून दिले. मी आता फिरायला जाऊ शकतो, माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवू शकतो आणि कोणत्याही आधाराशिवाय स्वतंत्रपणे जगू शकतो. प्रक्रियेमुळे मला खरोखरच जगण्याची दुसरी संधी मिळाली आहे *अशी प्रतिक्रिया रुग्ण श्री. शिवाजी सांगलीकर यांनी व्यक्त केली.*