कोण पटकावणार बहुमानाचा अटल करं
ज्येष्ठ रंगकर्मी सतीश पुळेकर यांचा "गौरव रंगभूमीचा" पुरस्काराने होणार सन्मान
पनवेल(प्रतिनिधी) एकाहून एक अशा सरस अशा एकांकिका सादर होत असल्याने यंदाचा बहुमानाचा अटल करंडक कोण पटका
शुक्रवारपासून सुरु झालेल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत राज्यातून निवड झालेल्या २५ एकांकिकांचे सादरीकरण होत आहेत. त्यामध्ये एकांकिकांना रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. उत्कृष्ट आयोजन व नियोजन, भरघोस रक्कमेचे पारितोषिके, ज्येष्ठ कलाकारांचे मार्गदर्शन आणि संधी यांचे मिलाप असलेल्या या स्पर्धेतून आजवर अनेक कलाकार घडले आहेत. नाटय चळवळ वॄद्धींगत व्हावी व नाटय रसिकांना आपले नाटयाविष्कार प्रदर्शित करता यावे, त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, तसेच देशाच्या विकासासाठी सदैव धडपडणारे भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारांचा वारसा वॄद्धींगत व्हावा, यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापालिकेचे माजी सभागृहनेते व नाट्य परिषद पनवेल शाखा उपाध्यक्ष परेश ठाकूर यांनी ‘अटल करंडक एकांकीका’ या दर्जेदार स्पर्धेचा प्रारंभ केला. नामवंत, उमदे आणि हौशी कलावंत या स्पर्धेकडे नेहमीच आकर्षित होतात. स्पर्धेचे देखणे व निटनेटके संयोजन, आकर्षक पारितोषिके, दर्जेदार परिक्षण आणि सर्वोत्तम स्पर्धास्थळ यामुळे ही स्पर्धा नाट्य रसिकांच्या गळयातील ताईत बनली. दरवर्षी या स्पर्धेला राज्यातील कलाकार आणि प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभत असतो. त्यामुळे हि स्पर्धा राज्यात नावाजली असून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांना यंदाही भरघोस रक्कमेची पारितोषिके देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. या स्पर्धेचे प्रायोजक ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रा. लिमिटेड तर सहप्रायोजक नील ग्रुप आणि स्थळ प्रायोजक पनवेल महानगरपालिका आहे.
या राज्यस्तरीय अटल करंडक एकां
अंतिम फेरीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच पारितोषिक वितरणाच्या दिवशी सकाळी ९ वाजल्यापासून उर्वरित एकांकिकांचे सादरीकरण होणार आहे. त्यामध्ये गोंद्या आणि कमुचा फार्स (रंगशाळा जळगाव), जापसाल (उगवाई कलारंग फोंडाघाट कणकवली), आविघ्नेया (सिडेनहॅम कॉलेज मुंबई ), बॉईल्ड- शुद्ध शाकाहारी (कलादर्शन व नाट्यशृंगार पुणे), बॉडी ऑफ नरेवाडी (फितूर थिएटर्स सोसायटी, संत झेवियर कॉलेज मुंबई), पाटी (एकदम कडक नाट्यसंस्था मुंबई) आणि वेदना सातारकर हजर सर (सी. के. ठाकूर स्वायत्त महाविद्यालय पनवेल) या एकांकिकांचा समावेश आहे. त्यानंतर पारितोषिक वितरण सोहळा होणार आहे.