सी.के ठाकूर विद्यालयाचा २९ वा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात साजरा

 सी.के ठाकूर विद्यालयाचा २९ वा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात साजरा


  पनवेल (प्रतिनिधी ) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर मराठी पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालयाचे २९ वे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा 'महाराष्ट्राची लोक परंपरा' या शीर्षकाखाली मोठ्या उत्साहात पार पडले.

या सोहळ्यास प्रमुख अतिथी पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद माताळे,  शकुंतलाताई रामशेठ ठाकूर, समारंभ अध्यक्ष जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यकारणी मंडळ सदस्य अनिल भगतअर्चना परेश ठाकूर, माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी गटशिक्षण अधिकारी नवनाथ साबळे, माजी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, माजी नगरसेविका राजश्री वावेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, श्री. भगत सर, नरेश पाटील, शिल्पी जैस्वाल, अर्चना पाटील, प्राची अमित जाधव, अंकुश माताळे,  प्रशांत मोरे, कैलास सत्रे, इंग्रजी माध्यमाचे मुख्याध्यापक संतोष चव्हाण, मुख्याध्यापिका निलिमा शिंदे, अजित सोनवणे,.कैलास म्हात्रे वैशाली पारधी या मान्यवरांनी उपस्थिती होती.   

 मुख्याध्यापक सुभाष मानकर यांनी उपस्थित मान्यवरांचे शाल,  श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले. सहाय्यक शिक्षक युवराज धनवटे यांनी पाहुण्यांचा परिचय उपस्थितांना करून दिला. मुख्याध्यापक सुभाष मानकर यांनी आपल्या प्रास्ताविकेतून मराठी पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाची प्रगतीच्या दिशेने होत असलेली वाटचाल त्यासाठी संस्थेचे कार्याध्यक्ष लोकनेते रामशेठ ठाकूर व संचालक मंडळ यांचे मिळत असलेले सहकार्य अधोरेखित केले. 

         पारितोषिक वितरण सोहळ्यात विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा,पालकांचा व शिक्षकांचा  मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक सुभाष मानकर यांना चिल्ड्रेन अकॅडमी व गौतम एज्युकेशन सोसायटी इचलकरंजी यांच्यातर्फे देण्यात येणाऱ्या बेस्ट स्कूल अवॉर्ड व ॲक्टिव्ह मुख्याध्यापक अवॉर्ड कार्यक्रमाचे प्रमुख मुंबईचे पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद माताळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच सहाय्यक शिक्षिका विजयश्री थळी व मंजिरी धोत्रे यांना ऍक्टिव्ह टीचर अवॉर्ड मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. या स्नेहसंमेलनात रायगड भूषण पुरस्कार प्राप्त व्हॉइस मिमिक्री आर्टिस्ट किशोर भगत यांनी आपली कला सादर करून कार्यक्रमांमध्ये रंगत आणली. या सोहळ्यात 'महाराष्ट्राची लोक परंपरा या  शीर्षकांतर्गत पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी बहारदार कलाविष्कार सादर केले.  कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख अतिथी विशेष अतिथी व इतर मान्यवर त्यांच्या सुहस्ते पूजन करण्यात आले. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व स्वागत गीत सादर केले त्यांना विद्यालयाचे संगीत शिक्षक संतोष खरे सर व अर्चना पाटील यांनी संगीत साथ दिली.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व मान्यवरांचे आभार प्रदर्शन सहाय्यक शिक्षक पंढरीनाथ जाधव यांनी केले.