पनवेल लायन्स आणि डॉ. पटवर्धन स्मृती रुग्णालयाचे डायलिसिस सेंटर-ला.संजय पोतदार यांचे मोठे योगदान
पनवेल/प्रतिनिधी-
लायन्स क्लब ऑफ पनवेल आणि डॉ. पटवर्धन स्मृती रुग्णालयाचे माध्यमातून नुकतेच डायलिसिस सेंटर चे उद्घाटन नुकतेच प्रांतपाल एन आर परमेश्वरन आणि जेष्ठ लायन संजय पोतदार यांचे हस्ते संपन्न झाले.लायन संजय पोतदार यांनी पनवेल लायन्स क्लब ला दिलेल्या भरघोस देणगीतून हा उपक्रम संपन्न झाला.
या प्रसंगी उपस्थित प्रांतपाल एन आर परमेश्वरन यांनी या उपक्रमाबद्दल पनवेल लायन्स क्लबचे कौतुक केले आणि या माध्यमातून पनवेल परिसरातील गरजू रुग्णांना फायदा होईल असे सांगितले. ज्येष्ठ लायन संजय पोतदार यांनी सांगितले की पनवेल लायन्स क्लब गेली अनेक वर्षे पनवेल परिसरात विविध सेवाभावी उपक्रम आयोजित करुन कार्यरत आहे आणि पनवेल क्लबचा काही तरी स्थायी स्वरूपाचा उपक्रम असावा हे स्वप्न आज या डायलिसिस सेंटर द्वारे पूर्ण होत आहे. या सेंटर मध्ये रुग्णांना माफक दरात सेवा दिली जाईल.
या वेळी डॉ. कीर्ती समुद्र यांनी यावेळी पनवेल लायन्स क्लब मुळेच आज हे डायलिसिस सेंटर नवीन स्वरूपात सुरू होत आहे असे प्रतिपादन केले आणि भविष्यात सुद्धा लायन्स चे सहकार्य असेच मिळत राहील असा विश्वास व्यक्त केला.
याप्रसंगी मल्टिपल काऊन्सिल चेअरमन ए के शर्मा, प्रथम प्रांतपाल संजीव सुर्यवंशी, द्वितीय प्रांतपाल प्रवीण सरनाईक, जी एस टी चेअरमन विजय गणात्रा रिजन चेअरमन सुयोग पेंडसे, पटवर्धन स्मृती रुग्णालयाचे पदाधिकारी आणि लायन सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पनवेल लायन्स क्लबचे अध्यक्ष एस जी चव्हाण, सचिव अशोक गिल्डा यांनी खूप परिश्रम घेतले.