चला खेळूया पैठणी कार्यक्रमाला शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांची उपस्थिती
पनवेल : मकरसंक्रांत म्हटलं की महिलांमध्ये एक वेगळाच उत्साह दिसून येतो. मकरसंक्रांतीनंतर घरोघरी हळदीकुंकूचा कार्यक्रम होतो. ही परंपरा जपत उलवे येथील शिव संघर्ष प्रतिष्ठान तर्फे हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. शेकापचे नेते प्रीतम जे एम म्हात्रे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अभिष्टचिंतन सोहळा केक कापून साजरा करण्यात आला. आपल्या भगिनींना घरातील व्यस्त जीवनातून स्वतःसाठी वेळ काढून करमणुकीसाठी “चला खेळूया पैठणी” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाला उलवे शहरामधील महिला भगिनींची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांचे सह त्याची पत्नी सौ.ममता प्रितम म्हात्रे, परिसरातील ज्येष्ठ नागरिक , शिवसंघर्ष प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. आपल्या रूढी परंपरा जपत अशा प्रकारे श्री अखिल यादव यांच्या शिवसंघर्ष प्रतिष्ठान मार्फत उलवेकरांसाठी उत्कृष्ट नियोजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल प्रीतम म्हात्रे यांनी त्यांचे मनापासून आभार मानले.