पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती व डॉ प्रभाकर पटवर्धन हॉस्पिटल ,पनवेल यांच्या विद्यमाने पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांसाठी मोफत आरोग्य तपासणी

पुरेशी झोप  आणि व्यायाम  निरोगी आयुष्यासाठी आवश्यक : आहार तज्ञ प्राची अंबोलकर



पनवेल /प्रतिनिधी
 पुरेशी झोप आणि व्यायाम निरोगी आयुष्यासाठी आवश्यक  असून ,रात्रीचे उशिरा जेवण हे टाळले पाहिजे रात्री लवकर जेवण केले तर बहुतांश आजार कमी होतात , दुपारी आणि  रात्री सलाड जेवणा आधी खावे, कोशिंबीर, सलाड आहारात असायलाच पाहिजे  त्यामुळे ब्लड शुगर लेवल कमी होते . फायबर युक्त आहार असावा ,बियांचे सेवन केले पाहिजे. अळशीच्या कच्च्या  बिया पाण्यात रात्री भिजून ठेवून सकाळी खाण्याने वजन कमी होते, कोलेस्ट्रॉल कमी होते ,वजन कमी होते .आहारात प्रोटीनचा समावेश असावा , रात्री भिजवलेले शेंगदाणे सकाळी  खाऊ शकता  एग व्हाईट खाऊ शकता ,वेळची केळे खावे. पुरेसे पाणी  प्यावे प्लास्टिक बॉटल चा वापर टाळावा स्टील ची किंवा तांब्याची बाटली वापरावी ,नास्ता मध्ये इडली उपमा पोहे , चहा उपाशी पोटी घेऊ नये काहीतरी खाऊन चहा घेतला तर एक वेळ चालेल चहा चपाती खाणे टाळावे , आपला पारंपरिक नास्ता खाऊ शकता बाहेरचे अन्न खाण्यापेक्षा  घरचा आहार  घ्यावा , बाहेरील पदार्थ खातो त्यामध्ये बहुतांश डालडा ,पाम तेल चा वापर केला जातो ते आरोग्यास चांगला नसते  ताण तणाव स्ट्रेस यामुळे , ऍसिडिटी वाढते जास्त काळ उपाशी राहिल्याने ऍसिडिटी वाढते अशा विविध आरोग्याच्या दृष्टीने हेल्थ टीप  आंतरराष्ट्रीय व्याख्यात्या आहार तज्ञ प्राची अबोलकर यांनी दिल्या पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती आणि  डॉ प्रभाकर पटवर्धन हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने  पत्रकार दिनाचे औचित्य साधत आहार तज्ञ प्राची अंबोलकर यांचे आहाराबाबत मर्दासर्शन शिबीर आणि पत्रकारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराला पत्रकार बंधू बघिणींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला
  . यावेळी पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे , जेष्ठ पत्रकार अनिल भोळे , कार्याध्यक्ष राम बोरीले,उपाध्यक्ष गणपत वारगड, सचिव शंकर वायदंडे,खजिनदार राजेंद्र कांबळे ,अण्णासाहेब आहेर ,विशाल सावंत ,पटवर्धन हॉस्पिटल चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील लगाटे,जनसंपर्क अधिकारी प्रसन्ना खेडकर उपस्थित होते.  
   पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती व डॉ प्रभाकर पटवर्धन हॉस्पिटल ,पनवेल यांच्या विद्यमाने सालाबाद प्रमाणे पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकारांसाठी मोफत आरोग्य तपासणी केली जाते .यावर्षी देखील तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्याशिवाय  आहार तज्ञ आंतरराष्ट्रीय व्याख्यात्या प्राची अंबोलकर यांचे आहाराबाबत मार्गदर्शन शिबीर ठेवण्यात आले होते या कार्यक्रमाला तालुक्यातील पत्रकार  बंधू बघिणींनी मोट्या प्रमाणात उपस्तीथी दर्शवली .
वर्षाचे ६५ दिवस बातमीमागे  धावपळ करणाऱ्या माध्यम प्रतिनिधींचे आरोग्य धोक्यात असते ,जाणीवपूर्वक वेळ काढून  बरेच माध्यम प्रतिनिधी आरोग्य तपासणी करायला जात नाहीत , म्हणूनच पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने दर वर्षी  ६ जानेवारी पत्रकार दिनाचे औचित्य साधत पत्रकारांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करते  गेली तीन वर्षे सलग डॉ प्रभाकर  पटवर्धन हॉस्पिटल येथे  हॉस्पिटल च्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन केले जाते या शिबिरात सीबीसी ,ब्लड टेस्ट ,दातांची तपासणी ,इसीजी ,बीएमडी आदी तपासण्या मोफत करण्यात आल्या .
आजच्या धकाधकीच्या जीवनात आपला आहार काय असावा काय खावे काय वर्ज्य करावे याचे ज्ञानं बऱ्याच जणांना नसते पत्रकार दिनाचे औचित्य साधत पत्रकारांसाठी उपयुक्त  असे आहारा बाबतचे मार्गदर्शन शिबीर देखील यावेळी ठेवण्यात आले होते देश विदेशात जाऊन व्याख्यान देणाऱ्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या आहार तज्ञ प्राची आंबोलकर यांचे आहाराबाबतचे मार्गदर्शन शिबिराचे आयोजन  यावेळी करण्यात आले होते या शिबिराला जेष्ठ पत्रकार  गणेश कोळी , संजय कदम ,दीपक महाडिक अनिल कुरघोडे, रवींद्र गायकवाड , लालचंद यादव ,सनीप कलोते,अप्पासाहेब मगर ,प्रतीक घोलप ,  गौरव जहागीरदार ,विकास पाटील ,रोहिता साळुंके ,सोनल नलावडे ,सुनील वारगडा,  अनिल राय,मुकुंद कांबळे ,सुरेश भोईर , आशिष साबळे आदी पत्रकार उपस्थित होते .