तूराडे ग्रामपंचायत कार्यालयाचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते लोकार्पण
पनवेल : तुराडे ग्रामपंचायतीच्या नुतन इमारत कार्यालयाचे लोकार्पण शेकाप नेते आणि पनवेल पालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते रविवार दिनांक १९ जानेवारी २०२५ रोजी पार पडले. तुराडे ग्रामपंचायतीचा यापुढील कारभार नवीन इमारतीतून होईल आणि ग्रामस्थांना एक पारदर्शक सेवा ग्रामपंचायतच्या माध्यमातून मिळेल अशी आशा व्यक्त करून ग्रामपंचायत सरपंच- उपसरपंच ,सर्व सदस्य, ग्रामसेवक आणि ग्रामस्थांना प्रीतम म्हात्रे यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी वाढदिवसाच्या निमित्ताने अभिष्टचिंतन करून केक कापून प्रीतम म्हात्रे याना शुभेच्छा देण्यात आल्या.
बदलत्या काळाबरोबर रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायती सुद्धा अद्ययावत होत आहेत याबद्दल समाधान वाटते. यावेळी प्रीतम म्हात्रे यांच्यासोबत त्यांची पत्नी सौ. ममता प्रितम म्हात्रे, सौ. रंजना गायकवाड (सरपंच तुराडे), सौ. राजश्री राजेश पाटील (सरपंच देवळोली), सौ. उमाताई मुंडे (सरपंच वासांबे), सौ. मालती संतोष वाघमारे (उपसरपंच तुराडे), श्री. देवेंद्र अनंत पाटील (उपसरपंच देवळोली), श्री. चंद्रकांत नानाभाऊ (मा. सरपंच तुराडे), कु. रिया माळी (मा. उपसरपंच), सौ. ताराबाई सुरेश ठाकूर, श्री. सुरेश आत्माराम ठाकूर, सौ. मयुरी मयूर देवघरे, सौ. नेत्रा घरत, श्री. शंकर ढवळे, सौ. साधना नरेश ठाकूर व सर्व तुराडे ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.