स्वप्नपूर्ती क्रिकेट लीग सामन्यात "स्वप्नपूर्ती योद्धा विजयी

 स्वप्नपूर्ती क्रिकेट लीग  सामन्यात "स्वप्नपूर्ती योद्धा विजयी

 नवी मुंबई /प्रतिनिधी 

       सिडको ने वसविलेल्या स्वप्नपूर्ती ग्रह संकुलामध्ये 26 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी धनंजय वैद्य यांच्या स्वप्नपूर्ती योद्धा संघाने अटीतटीच्या लढतीत रॉयल वीर मराठा संघाचा पराभव करत विजयश्री खेचून आणली. यावेळी मालिकावीर म्हणून प्रवीण उतेकर, उत्कृष्ट फलंदाज प्रदीप उतेकर, उत्कृष्ट गोलंदाज राम उतेकर आदींची निवड करण्यात आली.

      स्वप्नपूर्ती ग्रह संकुलामध्ये  प्रजासत्ताक दिनाचे अवचित  साधत स्थानिक रहिवाशांच्या माध्यमातून स्वप्नपूर्ती क्रिकेट लीग सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. हे या सामन्यांचे दुसरे वर्ष होते. यामध्ये स्वप्नपूर्ती योद्धा, रॉयल वीर मराठा, जय महाराष्ट्र, जी के फायटर्स, रॉयल 20-40, मातोश्री ट्रॅव्हल्स स्वप्नपूर्ती स्ट्रायकर्स, रायझिंग स्टार्स रायझिंग इलेव्हन, जॉय इलेव्हन, आणि वरे एक्सप्रेस आदी संघानी  भाग घेतला होता. हे क्रिकेट सामने यशस्वी करण्याकरिता धनंजय वैद्य, चेतन सपकाळ,, अविनाश तांबे, रोहित सपकाळ, शशिकांत गायकवाड, केतन सपकाळ, राम गव्हाणे, तुषार सुवर्णकार, निखिल ढोमसे, प्रवीण वरे, प्रमोद घेवारे, धनराज शेट्टी, रोहित शिर्के, गौरव कांबळे , संभाजी पाटील, विवेक प्रधानआणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष मेहनत घेऊन हे क्रिकेट सामने यशस्वी केले.