पी. डी. जी. पी. ए. च्या क्रिकेट सामन्यात खारघर फिनिक्स विजयी

 पी. डी. जी. पी. ए. च्या क्रिकेट सामन्यात खारघर फिनिक्स विजयी


पनवेल /प्रतिनिधी.

         पनवेल डॉक्टर जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन च्या वतीने  पनवेल परिसरातील डॉक्टरांसाठी दिनांक 5 जानेवारी 2025 रोजी पनवेल जवळील महात्मा फुले कॉलेजमध्ये क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये खारघर फिनिक्स संघाने तलोजा टायगर्स या संघावर मात करत विजयश्री खेचून आणली. यावेळी मालिकावीर म्हणून डॉ. क्षितिज , उत्कृष्ट फलंदाज डॉ. अनिकेत भोईर, उत्कृष्ट गोलंदाज डॉ. नबिल, उत्कृष्ट  क्षेत्ररक्षक डॉ. असीम पटेल. आदींची निवड करण्यात आली.

     पनवेल डॉक्टर जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या स्पर्धा 2025 महोत्सव 4 व 5  जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात पार पाडल्या. चार तारखेला सर्व डॉक्टर्स साठी कॅरम, बुद्धिबळ व बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी डॉक्टरांसाठी पनवेल डॉक्टर्स प्रीमियम प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन सलग आठव्या वर्षी करण्यात आले होते यावेळेस पनवेल नवी मुंबई येथील12 संघांनी सहभाग घेतला होता प्रामुख्याने खारघर फीनिक्स, उलवे युनायटेड, खारघर वॉरियर, सिद्धी खारघर,नेरूळ चॅम्पियन्स, तलोजा टायगर्स, पनवेल प्राईड ,कर्नाळा वॉरियर्स, कामोठे किंग, पीडीजीपी टायगर्स, करंजडे  वॉरियर्स, पनवेल वॉरियर्स.आदींनी भाग घेतला होता. या क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन महेंद्र शेठ घरत, प्राचार्य गणेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले, या क्रिकेट स्पर्धेत दरम्यान विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्ती यामध्ये पेनचे आमदार रवीशेठ पाटील, पनवेलच्या माजी महापौर  डॉक्टर कविता चौतमल, करंजाडे चे सरपंच मंगेश शेलार, माजी आमदार बाळाराम पाटील, माजी सभापती काशिनाथ पाटील, आणि पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आदींनी भेट देऊन खेळाडूंचा उत्साह वाढवला.

    सदर पीडीजीपीए क्रिकेट सामन्यांचे आयोजन अध्यक्ष डॉ. वैभव  मोकल, उपाध्यक्ष डॉ.सौ वैष्णवी नाईक, सचिव डॉ.विवेक महाजन,खजिनदार डॉ संदेश बहाडकर,डॉ. सुदर्शन मेटकर,डॉ वैभव पाटील, डॉ. मिलिंद टिपणीस, डॉ. वसंत पाटील. डॉक्टर सचिन मोकल आदींनी यशस्वीरित्या पार पाडले.