शाळेतील विद्यार्थिनींसाठी हिमोग्लोबिन चेकअप शिबिर

 शाळेतील विद्यार्थिनींसाठी हिमोग्लोबिन चेकअप शिबिर


पनवेल : रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल, पनवेल महानगरपालिका आरोग्य विभाग आणि के व्ही कन्या विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने “चेरी ब्लॉसम” या प्रकल्पा अंतर्गत शाळेतील विद्यार्थिनींसाठी “हिमोग्लोबिन चेकअपचे शिबिर” आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला शेकाप नेते रायगड जिल्हा खजिनदार श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी भेट दिली. 
     शाळेतील विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारे आरोग्य विषयक कॅम्प घेणे गरजेचे आहे. त्यासाठी वरील संस्थांनी पुढाकार घेतला. त्याबद्दल शाळा कमिटी चेअरमन म्हणून त्यांचे प्रीतम म्हात्रे यांनी मनापासून आभार मानले. शाळेच्या विद्यार्थिनींची आरोग्य विषयक काळजी घेताना अशा प्रकारे भविष्यातही आरोग्य विषयक शिबिर आयोजित करण्याचा मानस असल्याचे प्रीतम म्हात्रे यांनी सांगितले
        यावेळी डॉ. गिरीश गुणे, डॉ. अमोद दिवेकर, डॉ. हितेन शहा व पनवेल मधील प्रतिष्ठित डॉक्टर उपस्थित होते.