आमदार प्रशांत ठाकूर यांचा मतांच्या आघाडीच्या संख्येत वृक्षारोपणाचा संकल्प;पांडवकडा येथे वृक्षारोपण करून शुभारंभ

आमदार प्रशांत ठाकूर यांचा मतांच्या आघाडीच्या संख्येत वृक्षारोपणाचा संकल्प;पांडवकडा येथे वृक्षारोपण करून शुभारंभ 



पनवेल (प्रतिनिधी) विधानसभा निवडणुकीत आमदार प्रशांत ठाकूर यांनी चौथ्यांदा विजय मिळवला. या निवडणुकीत मिळविलेल्या मतांच्या आघाडीनुसार पाच वर्षात त्या संख्येत वृक्षांचे रोपण करण्याचा संकल्प आमदार प्रशांत ठाकूर यांनी केला आहे. त्या अनुषंगाने खारघर मधील पांडवकडा येथे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी आणि पनवेल महपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
       पनवेल विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रशांत ठाकूर हे पर्यवरणाचा समतोल राखण्यासाठी तसेच पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी नेहमीच अग्रेसर असतात. त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमीत्त देखील भव्य स्वरूपात  वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवला होता. नुकताच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार प्रशांत ठाकूर यांना मिळालेल्या मतांतुन ५१ हजार ९१ मतांची आघाडी घेत दणदणीत विजय मिळवला. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी आघाडी मतांच्या संख्येत येत्या ५ वर्षांमध्ये संपुर्ण पनवेल मतदार संघामध्ये या वृक्षांचे रोपण करण्याचा संकल्प केला आहे. या संकल्पाचा शुभारंभ खारघर मधील पांडवकडा परिसरात ५०० झाडांची लागवड करुन करण्यात आला. यावेळी भाजपचे खारघर शहर अध्यक्ष प्रविण पाटील, माजी नगरसेवक हरेश केणी,  अँड.  मनोज भुजबळ, अँड.नरेश ठाकूर, भीमराव पोवार, शहर सरचिटणीस दिपक शिंदे, भूपेश चव्हाण, अँड.  चेतन जाधव, हेमंत माने यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.