नवी मुंबई महापालिका मुख्यालयात प्रजासत्ताकदिनी आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण

 नवी मुंबई महापालिका मुख्यालयात प्रजासत्ताकदिनी आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण



     

      भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या प्रांगणात महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ.कैलास शिंदे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी राष्ट्रगीतानंतर राज्यगीत म्हणून मानवंदना देण्यात आली.  

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री.शरद पवार, शहर अभियंता श्री. शिरीष आरदवाड आणि इतर विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस दल व अग्निशमन दलाचे जवान उपस्थित होते. याप्रसंगी आयुक्तांसह सर्व विभागप्रमुखांची राष्ट्रीय पोषाखामध्ये पारंपारिक पध्दतीने फेटे परिधान करून असलेली उपस्थिती लक्षवेधी होती.

यावेळी भारतीय संविधानच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधत ध्वजारोहणानंतर संविधानाच्या उद्देशिकेचे आयुक्तांसमवेत उपस्थितांनी सामुहिक वाचन केले. यामध्ये डॉ.डि.वाय.पाटील विधी महाविद्यालयाचे विद्यार्थीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रजासत्ताक दिनानिमित्त महानगरपालिका मुख्यालयाच्या आयकॉनिक इमारतीस तिरंगी रंगात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून नागरिक मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवित आहेत.